फीचर्सपासून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही; 12GB RAM, 65W फास्ट चार्जसह Realme GT 2 लाँच
By सिद्धेश जाधव | Published: April 22, 2022 05:13 PM2022-04-22T17:13:03+5:302022-04-22T17:16:31+5:30
Realme GT 2 स्मार्टफोननं भारतात 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग, 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह एंट्री घेतील आहे.
Realme GT 2 Pro काही दिवसांपूर्वी भारतात आला आहे. तेव्हपासून भारतीय चाहते या फोनच्या वॅनिला व्हर्जनची वाट बघत आहेत. रियलमीनं कोणताही गाजावाजा न करता किफायतशीर फ्लॅगशिप Realme GT 2 स्मार्टफोन लाँच केला आहे. यात 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग, 5000mAh बॅटरी, Snapdragon 888 5G SoC आणि 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.
Realme GT 2 ची किंमत
Realme GT 2 स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 34,999 रुपये आहे. तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल 38,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन पेपर ग्रीन, पेपर व्हाइट आणि स्टील ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये कंपनीच्या वेबसाईटसह Flipkar वरून 28 एप्रिलपासून विकत घेता येईल.
Realme GT 2 चे स्पेसिफिकेशन्स
रियलमी जीटी 2 स्मार्टफोनमध्ये 6.62 इंचाचा फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा दिली आहे. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित रियलमी युआय 3.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट आणि एड्रेनो 660 जीपीयूला देण्यात आला आहे. फोनमध्ये 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंत UFS 3.1 इंटरनल स्टोरेज मिळेल.
फोटोग्राफीसाठी रियलमी जीटी 2 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी आयएमएक्स776 सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स471 सेन्सर फ्रंट कॅमेरा म्हणून देण्यात आला आहे. Realme GT 2 5G फोन बेसिक कनेक्टिव्हिटीफीचर्ससह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी 65वॉट फ्लॅश चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.