बड्या कंपन्यांच्या पंगतीत Realme चा समावेश; 12GB RAM, Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह शक्तिशाली Realme GT 2 Pro लाँच
By सिद्धेश जाधव | Published: January 5, 2022 11:49 AM2022-01-05T11:49:36+5:302022-01-05T11:50:49+5:30
Realme GT 2 Pro 5G Phone Launch: Realme GT 2 Pro 5G Phone चीनमध्ये 12GB RAM, 5000mAh Battery, 2K Display, 50MP Camera आणि 65W फास्ट चार्जिंग अशा भन्नाट फीचर्ससह सादर करण्यात आला आहे.
Realme GT 2 Pro 5G Phone Launch: Realme नं शक्तिप्रदर्शन करत realme GT 2 series सादर केली आहे. या सीरीजमध्ये realme GT 2 आणि realme GT 2 Pro नावाचे दोन दमदार स्मार्टफोन कंपनीनं सादर केले आहेत. या सध्या चीनमध्ये आलेले हे फोन्स लवकरच जागतिक बाजारात सादर केले जातील. या लेखात आपण कंपनीच्या आजवरच्या बेस्ट स्मार्टफोन Realme GT 2 Pro ची माहिती घेणार आहोत.
Realme GT 2 Pro चे स्पेसिफिकेशन
रियलमी जीटी 2 प्रो स्मार्टफोन 2K LTPO AMOLED डिस्प्लेसह येणारा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. हा एक 1440 x 3216 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.7 इंचाचा डिस्प्ले आहे. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, 1000हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 1400निट्स ब्राईटनेस, 5000000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो आणि 1.07 बिलियन कलरला सपोर्ट करतो. कंपनीनं या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा दिली आहे.
शक्तिशाली Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट realme GT 2 Pro स्मार्टफोनची खासियत म्हणता येतील. हा फोन अँड्रॉइड 12 ओएस आधारित रियलमी युआय 3.0 वर चालतो. कंपनीनं यात 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देखील दिली आहे. या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी 65W SuperDart फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.
फोटोग्राफीसाठी हा फ्लॅगशिप रियलमी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी आईएमएक्स766 सेन्सर आहे. सोबत 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. समोर 32 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स615 सेन्सर सेल्फी कॅमेऱ्याचे काम करतो.
Realme GT 2 Pro ची किंमत
- Realme GT 2 Pro 8GB/128GB: 3,899 युआन (सुमारे 45,600 रुपये)
- Realme GT 2 Pro 8GB/256GB: 4,199 युआन (सुमारे 49,300 रुपये)
- Realme GT 2 Pro 12GB/256GB: 4,299 युआन (सुमारे 50,500 रुपये)
- Realme GT 2 Pro 12GB/512GB: 4,799 युआन (सुमारे 56,300 रुपये)
हा फोन Paper White, Paper Green, Steel Black आणि Titanium Blue कलरमध्ये विकत घेता येईल.
हे देखील वाचा:
'सॉरी, तुम्ही कोण?' व्हॉट्सअॅपवरचा हा मेसेज करेल तुमचं बँक अकॉउंट रिकामं