एक तासात 10 कोटींचा माल संपला; स्वस्तात फ्लॅगशिप फिचर देण्याचा Realme GT 2 Pro ला फायदा 

By सिद्धेश जाधव | Published: April 15, 2022 05:45 PM2022-04-15T17:45:34+5:302022-04-15T17:45:49+5:30

Realme GT 2 Pro स्मार्टफोनच्या पहिला सेलला चांगलं यश मिळालं आहे. फ्लॅगशिप किलर स्पेक्ससह पदार्पण करण्याचा स्मार्टफोनला फायदा झाला आहे.

Realme GT 2 Pro Creates New Record Of Fastest Selling Android Smartphone  | एक तासात 10 कोटींचा माल संपला; स्वस्तात फ्लॅगशिप फिचर देण्याचा Realme GT 2 Pro ला फायदा 

एक तासात 10 कोटींचा माल संपला; स्वस्तात फ्लॅगशिप फिचर देण्याचा Realme GT 2 Pro ला फायदा 

Next

Realme GT 2 Pro स्मार्टफोनचा पहिला सेल 14 एप्रिलला आयोजित करण्यात आला होता. कमी किंमतीत फ्लॅगशिप ग्रेड स्पेक्स देण्याचा फायदा झाल्याचं या सेलमधून दिसून आलं. हा फोन फ्लिपकार्टवर सर्वात वेगाने विकला गेलेला अँड्रॉइड प्रीमियम फ्लॅगशिप फोन बनला आहे. सेलच्या पहिल्या एक तासांत 10 कोटी रुपयांचे Realme GT 2 Pro युनिट्स विकले गेले आहेत.  

या फोनची सर्वात मोठी खासियत यातील 2K LTPO डिस्प्ले म्हणता येईल. तसेच सध्या भारतीय बाजारात या फोनला फक्त मोटोरोला एज 30 प्रो कडून टक्कर मिळत आहे. या दोन्ही फोन्सचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जवळपास सारखेच आहेत. परंतु सेलच्या बाबतीत रियलमीनं बाजी मारल्याचं दिसत आहे.  

Realme GT 2 Pro चे स्पेसिफिकेशन  

रियलमी जीटी 2 प्रो स्मार्टफोन 2K LTPO AMOLED डिस्प्लेसह येणारा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. हा एक 1440 x 3216 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.7 इंचाचा डिस्प्ले आहे. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, 1000हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 1400निट्स ब्राईटनेस, 5000000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो आणि 1.07 बिलियन कलरला सपोर्ट करतो. कंपनीनं या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा दिली आहे.  

फोटोग्राफीसाठी हा फ्लॅगशिप रियलमी फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी आयएमएक्स766 सेन्सर आहे. सोबत 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. समोर 32 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स615 सेन्सर सेल्फी कॅमेऱ्याचे काम करतो.   

शक्तिशाली Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट realme GT 2 Pro स्मार्टफोनची खासियत म्हणता येतील. हा फोन अँड्रॉइड 12 ओएस आधारित रियलमी युआय 3.0 वर चालतो. कंपनीनं यात 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देखील दिली आहे. या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी 65W SuperDart फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.    

Realme GT 2 Pro ची किंमत 

या फोनचा 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेल 49,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेल्या टॉप एन्ड मॉडेलची किंमत 57,999 रुपये आहे. हा फोन पेपर व्हाईट आणि पेपर ग्रीन कलरमध्ये विकत घेता येईल. 

Web Title: Realme GT 2 Pro Creates New Record Of Fastest Selling Android Smartphone 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.