Realme आणतेय आकर्षक डिजाईन असलेला Smartphone; मिळणार शक्तिशाली फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 01:16 PM2021-11-30T13:16:16+5:302021-11-30T13:16:30+5:30
Realme GT 2 Pro: Realme GT 2 Pro स्मार्टफोन गुगल पिक्सल 6 सीरिज सारख्या डिजाईनसह सादर केला जाऊ शकतो. तीन कॅमेरे आणि हॉरीझॉन्टल कॅमेरा सेटअपसह येणारा हा पहिलाच रियलमी फोन असू शकतो.
Realme च्या आगामी फ्लॅगशिप फोनची डिजाईन समोर आली आहे. हा फोन Realme GT 2 Pro नावानं बाजारात दाखल होईल. डिजाईन सोबतच या फोनचे स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत. हा फोन 50 MP Camera, 256GB पर्यंत स्टोरेज आणि 125W फास्ट चार्जिंगसह सादर केला जाऊ शकतो. आता 91mobiles आणि OnLeaks नं मिळून रियलमी जीटी 2 प्रो स्मार्टफोनच्या डिजाईनचा खुलासा केला आहे.
Realme GT 2 Pro ची डिजाइन
Realme GT 2 Pro स्मार्टफोन प्रीमियम डिजाईनसह बाजारात येईल. यात हॉरीझॉन्टल कॅमेरा सेटअप मिळेल, जो कंपनीच्या आतापर्यंतच्या व्हर्टिकल कॅमेरा सेटअपपेक्षा कितीतरी वेगळा आहे. ही डिजाईन अलीकडेच आलेल्या गुगल पिक्सल 6 सीरिज सारखी दिसत आहे. फोनमधील सिरॅमिक बॅक पॅनलवर ड्युअल LED फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. हा फोन पंच होल आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह बाजारात येईल.
Realme GT 2 Pro चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
रिपोर्टनुसार, हा स्मार्टफोन 6.8 इंचाच्या WQHD+ ओलेड डिस्प्लेसह बाजारात येईल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह ग्राहकांच्या भेटीला येईल, जो आगामी फ्लॅगशिप प्रोसेसर आहे. यात 12 जीबी पर्यंतचा रॅम आणि 256 जीबी पर्यंतची स्टोरेज मिळू शकते.
फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आणि GR Lens असेल. हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह बाजारात येऊ शकतो. यातील बॅटरीच्या क्षमतेची माहिती मिळाली नाही, परंतु Realme GT 2 Pro मध्ये 125W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.