12GB RAM आणि 65W फास्ट चार्जिंगसह Realme GT 5G फोन झाला लाँच; बघा या दमदार फोनची किंमत
By सिद्धेश जाधव | Published: June 15, 2021 07:40 PM2021-06-15T19:40:38+5:302021-06-15T19:42:39+5:30
Realme GT 5G Global Launch: Realme ने शक्तिशाली Realme GT 5G युरोप आणि थायलंडमध्ये सादर केला आहे
Realme ने शक्तिशाली Realme GT 5G आंतरराष्ट्रीय बाजारात लाँच केला आहे. हा फोन युरोप आणि थायलंडमध्ये सादर करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत हा फोन भारतासह जगातील इतर बाजारांमध्ये दाखल होईल. (Realme GT 5G launched globally with Snapdragon 888 SOC)
Realme GT 5G ची किंमत
रियलमी जीटी 5जी फोन युरोपमध्ये दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला गेला आहे. फोनच्या छोट्या व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, या व्हेरिएंटची किंमत 449 यूरो म्हणजे जवळपास 39,800 रुपये आहे. तसेच, या फोनच्या मोठ्या व्हेरिएंटमध्ये 12 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, या मॉडेलची किंमत 599 यूरो म्हणजे अंदाजे 53,200 रुपये आहे.
Realme GT 5G चे स्पेसिफिकेशन
Realme GT 5G मध्ये 6.43-इंचाचा FHD+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटवर चालतो. हा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888 5G एसओसी आणि Adreno 660 GPU देण्यात आला आहे.
कॅमेऱ्यासाठी Realme GT 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सलच्या मुख्य सेन्सरसह 8 मेगापिक्सलची वाइड-अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. फोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलच्या सेल्फी शुटर देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. तसेच, फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 65W फास्ट चार्जिंगसह 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.