Realme GT 5G आणि Realme GT Master Edition लवकरच येऊ शकतात भारतात; फ्लॅगशिप स्पेक्ससह मिळणार 5G कनेक्टिव्हिटी  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 05:59 PM2021-07-27T17:59:12+5:302021-07-27T17:59:53+5:30

Realme GT Series India Launch: Realme GT 5G आणि Realme GT मास्टर एडिशन सीरीज लवकरच भारतात येऊ शकतात.

Realme gt 5g realme gt master edition models teased to launch in india  | Realme GT 5G आणि Realme GT Master Edition लवकरच येऊ शकतात भारतात; फ्लॅगशिप स्पेक्ससह मिळणार 5G कनेक्टिव्हिटी  

Realme GT 5G आणि Realme GT Master Edition लवकरच येऊ शकतात भारतात; फ्लॅगशिप स्पेक्ससह मिळणार 5G कनेक्टिव्हिटी  

googlenewsNext

गेल्या आठवड्यात रियलमीने आपल्या गृह मार्केट चीनमध्ये Realme GT Master Edition स्मार्टफोन लाँच केला होता, तर Realme GT 5G स्मार्टफोन मार्चमध्ये लाँच केला होता. आता हे दोन्ही स्मार्टफोन भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. रियलमी इंडियाचे सीईओ माधव शेठ यांनी ट्विटरवर प्रश्न विचारला होता कि भारतात पुढचा कोणता स्मार्टफोन लाँच झाला पाहिजे? या प्रश्नासह त्यांनी चार रियलमी जीटी सीरीजचे स्मार्टफोन दाखवले होते. त्यामुळे Realme GT 5G आणि Realme GT मास्टर एडिशन सीरीज भारतात येऊ शकतात, अशी चर्चा आहे. 

Realme GT 5G चे स्पेसिफिकेशन 

Realme GT 5G मध्ये 6.43-इंचाचा फुल एचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटवर चालतो. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888 5G एसओसी आणि Adreno 660 GPU देण्यात आला आहे. या फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. 

Realme GT 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 64 मेगापिक्सलच्या मुख्य सेन्सरसह 8 मेगापिक्सलची वाईड-अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या रियलमी फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 65W फास्ट चार्जिंगसह 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 

Realme GT Master Edition चे स्पेसिफिकेशन्स  

Realme GT Master Edition स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा फुल एचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 360Hz टच सॅंप्लिग रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G SoC देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी Realme GT Master Edition स्मार्टफोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64MP चा प्राइमरी कॅमेरा, 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. हा रियलमी फोन 32MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Realme GT Master Edition मध्ये पावर बॅकअपसाठी 4,300mAh ची बॅटरी 65W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.   

Web Title: Realme gt 5g realme gt master edition models teased to launch in india 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.