11GB रॅम, 64MP कॅमेऱ्यासह मिड रेंज Realme GT Master Edition भारतात सादर; 26 ऑगस्टपासून होणार विक्री 

By सिद्धेश जाधव | Published: August 18, 2021 03:17 PM2021-08-18T15:17:51+5:302021-08-18T15:24:19+5:30

Realme GT Master Edition India: Realme GT Master Edition स्मार्टफोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा, 64MP मुख्य कॅमेरा आणि Snapdragon 778G 5G चिपसेट असे दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत.

realme gt master edition launched in india with snapdragon 778g 5g chipset available from 26 august for sale | 11GB रॅम, 64MP कॅमेऱ्यासह मिड रेंज Realme GT Master Edition भारतात सादर; 26 ऑगस्टपासून होणार विक्री 

11GB रॅम, 64MP कॅमेऱ्यासह मिड रेंज Realme GT Master Edition भारतात सादर; 26 ऑगस्टपासून होणार विक्री 

googlenewsNext
ठळक मुद्देफोटोग्राफीसाठी Realme GT Master Edition ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. Realme GT Master Edition स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट भारतात उपलब्ध होणार आहेत.

Realme ने आज भारतात आपल्या फ्लॅगशिप जीटी सीरिज अंतर्गत दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. या स्मार्टफोन्सची नावे Realme GT आणि Realme GT Master Edition आहेत. चीनमध्ये पदार्पण केल्यानंतर हे दोन्ही स्मार्टफोन रियलमीच्या पहिल्या लॅपटॉप रियलमी बुकसह भारतात सादर करण्यात आले आहेत. Realme GT Master Edition स्मार्टफोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा, 64MP मुख्य कॅमेरा आणि Snapdragon 778G 5G चिपसेट असे दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत.  

Realme GT Master Edition चे स्पेसिफिकेशन्स  

Realme GT Master Edition मध्ये 6.43 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या रियलमी स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा मिडरेंज Snapdragon 778G 5G चिपसेट मिळतो. या फोनमध्ये 8GB पर्यंतचा रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. एक्सटेंडेड रॅम फिचरच्या मदतीने फोनचा रॅम 5GB पर्यंत वाढवता येतो. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित रियलमी युआयवर चालतो.  

हे देखील वाचा: स्नॅपड्रॅगॉन 888 प्रोसेसर, 12GB रॅमसह पावरफुल Realme GT 5G भारतात लाँच; देणार का शाओमी-वनप्लसला टक्कर?

फोटोग्राफीसाठी Realme GT Master Edition ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 64MP चा मुख्य कॅमेरा, 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा सेन्सर मिळतो. हा फोन 32MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी Realme GT Master Edition मध्ये 4300mAh ची बॅटरी 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते. चार्ज काला सपोर्ट दिला आहे.  

हे देखील वाचा: एकापेक्षा एक पावरफुल स्पेक्ससह iQOO 8 Pro 5G सादर; वेगवान स्नॅपड्रॅगन 888+ चिपसेटसह येणार बाजारात

Realme GT Master Edition ची किंमत 

Realme GT Master Edition स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट भारतात उपलब्ध होणार आहेत. या फोनचा 8GB रॅम व्हेरिएंट 26 ऑगस्टपासून फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या वेबसाईटवरून विकत घेता येईल. इतर व्हेरिएंटच्या उपलब्धतेची माहिती अजून गुलदस्त्यात आहे.    

  • 6GB रॅम + 128GB स्टोरेज: 25,999 रुपये  
  • 8GB रॅम + 128GB स्टोरेज: 27,999 रुपये  
  • 8GB रॅम + 256GB स्टोरेज: 29,999 रुपये  

Web Title: realme gt master edition launched in india with snapdragon 778g 5g chipset available from 26 august for sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.