लाँचपूर्वीच Realme GT Master Edition चे स्पेसिफिकेशन्स लीक; जाणून घ्या वैशिष्ट्ये
By सिद्धेश जाधव | Published: July 6, 2021 06:54 PM2021-07-06T18:54:12+5:302021-07-06T18:56:35+5:30
Realme GT Master Edition गीकबेंचवर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगनुसार या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 870 SoC प्रोसेसर असू शकतो.
Realme GT Master Edition चा लाँच जवळ असल्याचे दिसत आहे. या स्मार्टफोनची रोज नवीन माहिती समोर येत आहे. आता रियलमीचा हा नवीन स्मार्टफोन बेंचमार्किंग साईट Geekbench वर लिस्ट करण्यात आला आहे. हा फोन RMX3366 मॉडेल नंबरसह लिस्ट झाल्याची माहिती टिप्सटर मुकुल शर्माने दिली आहे.
या लिस्टिंगनुसार Realme GT Master Edition ला सिंगल-कोर टेस्टमध्ये 1022 आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 3054 गुण मिळाले आहेत. गीकबेंचवर हा फोन 3.19GHz ऑक्टा-कोर प्रोसेसरसह दिसला आहे. या फोनच्या मदरबोर्ड सेक्शनमध्ये ‘Kona’ चा उल्लेख करण्यात आला आहे, जे स्नॅपड्रॅगन 870 SoC चे कोडनेम आहे.
Realme GT Master Edition चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Realme GT Master Edition मध्ये 6.43-इंचाचा फुल एचडी+ सुपर अॅमोलेड 120Hz डिस्प्ले देण्यात येईल. हा रियलमी स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करेल. या फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असू शकते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येईल.
हा फोन अँड्रॉइड 11 आधारित Realme UI 2.0 वर चालेल. Realme GT मास्टर एडिशन मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64MP चा मुख्य सेन्सर, 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा डेप्थ सेन्सर दिला जाऊ शकतो. Realme GT Master Edition मध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. फोनमध्ये 4,300mAh ची बॅटरी देण्यात येईल.