रियलमीची जबरदस्त Realme GT Master Edition सीरीज लाँच; मिळणार 12GB रॅमसह 64MP कॅमेरा 

By सिद्धेश जाधव | Published: July 21, 2021 05:11 PM2021-07-21T17:11:26+5:302021-07-21T17:12:58+5:30

Realme GT Master Edition phones: Realme GT Master Edition आणि Realme GT Master Explorer Edition स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झाले आहेत

Realme gt master edition series launched with powerful processor and camera  | रियलमीची जबरदस्त Realme GT Master Edition सीरीज लाँच; मिळणार 12GB रॅमसह 64MP कॅमेरा 

रियलमीची जबरदस्त Realme GT Master Edition सीरीज लाँच; मिळणार 12GB रॅमसह 64MP कॅमेरा 

Next

कित्येक दिवस चर्चेत राहिल्यानंतर Realme GT Master Edition आणि Realme GT Master Explorer Edition स्मार्टफोन लाँच झाले आहेत. रियलमीने हे दोन्ही फोन जवळपास एकसारख्या डिजाईनसह चीनमध्ये लाँच केले आहेत. हे फोन्स लवकरच भारतासह जगभरात लाँच केले जातील अशी अपेक्षा आहे. यातील Master Edition मध्ये स्नॅपड्रॅगन 778G चिपसेट देण्यात आला आहे तर Master Explorer Edition स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसरला सपोर्ट करतो.  (Realme GT Master Edition phones go official with suitcase-inspired backs)

Realme GT Master Edition सीरिजची किंमत 

Realme GT Master Edition स्मार्टफोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट रियलमीने 2,399 RMB (अंदाजे 27,500 रुपये) मध्ये सादर केला आहे. तसेच फोनचा 8GB रॅम आणि 256GB व्हेरिएंट 2,599 RMB (अंदाजे 30,000 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. 

Realme GT Master Explorer Edition स्मार्टफोन देखील कंपनीने दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. या फोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल 2,799 RMB (अंदाजे 32,000 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. तर 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज मॉडेल 3,199 RMB (अंदाजे 36,000 रुपये) मध्ये लाँच झाला आहे. 

Realme GT Master Edition चे स्पेसिफिकेशन्स 

Realme GT Master Edition स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा फुल एचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 360Hz टच सॅंप्लिग रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G SoC देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी Realme GT Master Edition स्मार्टफोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64MP चा प्राइमरी कॅमेरा, 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. हा रियलमी फोन 32MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Realme GT Master Edition मध्ये पावर बॅकअपसाठी 4,300mAh ची बॅटरी 65W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.  

Realme GT Master Explorer Edition चे स्पेसिफिकेशन्स 

Realme GT Master Explorer Edition स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 870 चिपसेट मिळतो. 3D Vegan Leather बॉडीसह येणाऱ्या स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा, 16MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. Realme GT Master Explorer Edition स्मार्टफोन 32MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या 4,500mAh ची बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.  

Web Title: Realme gt master edition series launched with powerful processor and camera 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.