‘या’ दिवशी येणार 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग असलेला Realme GT Neo 2 फोन बाजारात  

By सिद्धेश जाधव | Published: September 13, 2021 03:26 PM2021-09-13T15:26:58+5:302021-09-13T15:27:10+5:30

Realme GT Neo 2 Launch: यावर्षीच्या सुरवातीला Realme GT Neo स्मार्टफोन सादर करण्यात आला होता. आता या फोनचा उत्तराधिकारी म्हणजे Realme GT Neo 2 स्मार्टफोन लवकरच बाजारात येणार आहे.

Realme GT Neo 2 to launch on 22 september with 12GB RAM Snapdragon 870 soc  | ‘या’ दिवशी येणार 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग असलेला Realme GT Neo 2 फोन बाजारात  

‘या’ दिवशी येणार 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग असलेला Realme GT Neo 2 फोन बाजारात  

googlenewsNext

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि Realme आपली फ्लॅगशिप ‘एक्स’ सीरिज बंद करणार आहे. या सीरिजची जागा नवीन ‘जीटी’ सीरिज घेणार आहे. या जीटी सीरिजमध्ये यावर्षीच्या सुरवातीला Realme GT Neo स्मार्टफोन सादर करण्यात आला होता. आता या फोनचा उत्तराधिकारी म्हणजे Realme GT Neo 2 स्मार्टफोन लवकरच बाजारात येणार आहे. अनेक दिवस लिक्स आणि लिस्टिंगमधून समोर आल्यानंतर आता कंपनीने स्वतःहून या स्मार्टफोनची लाँच डेट सांगितली आहे. रियलमीने सांगितले आहे कि Realme GT Neo 2 स्मार्टफोन येत्या 22 सप्टेंबरला लाँच केला जाईल. 

Realme GT Neo 2 स्मार्टफोन येत्या 22 सप्टेंबरला अधिकृतपणे सादर केला जाईल. याची माहिती कंपनीने चिनी सोशल मीडिया साईट विबोवर पोस्ट करून दिली आहे. या दिवशी हा फोन रियलमीच्या होम मार्केट म्हणजे चीनमध्ये लाँच केला जाईल. Realme GT Neo 2 चा लाँच इव्हेंट भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजून 30 मिनीटांनी सुरु होईल. चीनमध्ये सादर झाल्यानंतर हा फ्लॅगशिप रियलमी फोन भारतासह जगभरात सादर केला जाईल.  

Realme GT Neo 2 चे स्पेसिफिकेशन्स 

Realme GT Neo 2 मध्ये 6.62 इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात येईल. या पंच होल डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. फ्रंटला डावीकडे वरच्या बाजूला असेलेल्या या पंच होलमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात येईल. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल, त्यामुळे फोनमधील डिस्प्ले अ‍ॅमोलेड पॅनल असू शकतो. GT Neo 2 रेंडर्समध्ये कुठेही 3.5mm हेडफोन जॅक दिसत आहे. परंतु सिम ट्रे स्लॉट, टाइप-सी पोर्ट आणि स्पिकर ग्रिल फोनच्या तळाला देण्यात आले आहेत. उजवीकडे वॉल्यूम कंट्रोल बटण तर पावर बटण डावीकडे आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, हा फोन स्नॅपड्रॅगन 870 SoC सह येईल. तसेच या रियलमी फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात येईल. Realme GT Neo 2 डिवाइस अँड्रॉइड 11-आधारित Realme UI 2.0 वर चालेल. तसेच या फोनमधील 4,500 एमएएचची बॅटरी 65W किंवा 50W फास्ट चार्जिंगसह सादर केली जाऊ शकते. या फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64MP चा मुख्य कॅमेरा, 8MP चा अल्ट्रावाईड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळेल. पुढील काही आठवड्यात हा फोन चीनमध्ये सादर होऊ शकतो.   

Web Title: Realme GT Neo 2 to launch on 22 september with 12GB RAM Snapdragon 870 soc 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.