तब्बल 19GB RAM, 64MP कॅमेरा आणि वेगवान चार्जिंगसह Realme GT Neo 2 5G भारतात लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: October 13, 2021 03:02 PM2021-10-13T15:02:39+5:302021-10-13T15:02:52+5:30

Realme GT Neo 2 Price In India: Realme GT Neo 2 चे दोन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आले आहेत. यातील 8GB RAM आणि 128GB storage व्हेरिएंटची किंमत 31, 999 रुपये ठेवण्यात आली आहे.

Realme gt neo 2 price in india rs 31999 launch sale date october 17 know specifications features  | तब्बल 19GB RAM, 64MP कॅमेरा आणि वेगवान चार्जिंगसह Realme GT Neo 2 5G भारतात लाँच 

तब्बल 19GB RAM, 64MP कॅमेरा आणि वेगवान चार्जिंगसह Realme GT Neo 2 5G भारतात लाँच 

googlenewsNext

रियलमीने आज एका ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून अनेक प्रोडक्ट भारतात सादर केले आहेत. यात Realme 4K Smart Google TV Stick, Realme Brick ब्लूटूथ स्पिकर, Realme Buds Air 2 चा नियो कलर व्हेरिएंट, Realme Cooling Back Clip Neo, Realme Type-C SuperDart गेमिंग केबल आणि मोबाईल गेमिंग ट्रिगर यांचा समावेश आहे. परंतु या सर्व प्रोडक्ट पेक्षा सर्वात महत्वाचा Realme GT Neo 2 5G Phone या इव्हेंटमधून भारतात दाखल झाला आहे.  

Realme GT Neo 2 ची किंमत 

Realme GT Neo 2 चे दोन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आले आहेत. यातील 8GB RAM आणि 128GB storage व्हेरिएंटची किंमत 31, 999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8GB RAM आणि 256GB storage व्हेरिएंट 35,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन फोन तीन कलर ऑप्शनमध्ये 17 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या वेबसाईटसह ऑफलाइन स्टोरवरून विकत घेता येईल.  

Realme GT Neo 2 चे स्पेसिफिकेशन्स 

Realme GT Neo 2 स्मार्टफोन Samsung E4 Display सह बाजारात आला आहे. या फुलएचडी+ रिजोल्यूशन असलेल्या डिस्प्लेचा आकार 6.62 इंच आहे. हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश, 600हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 1300निट्स ब्राईटनेस आणि 500000:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करतो, तसेच या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे.   

Realme GT Neo 2 स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 870 हा 5G चिपसेट आहे. हा मोबाईल अँड्रॉइड 11 आधारित रियलमी युआय 2.0 वर चालतो. या डिवाइसमध्ये 12GB पर्यंतचा RAM आणि 256GB पर्यंतची UFS 3.1 storage स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन 7GB व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो त्यामुळे यातील एकूण RAM 19 GB पर्यंत वाढवता येतो.    

रियलमी जीटी नियो2 मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 64MP चा मुख्य सेन्सर, 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP ची पोर्टरेट लेन्स देण्यात आली आहे. या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि बेसिक कनेक्टिव्हिटी ऑप्शन्ससह यात 65W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.      

Web Title: Realme gt neo 2 price in india rs 31999 launch sale date october 17 know specifications features 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.