लाँच होण्याआधी Realme GT Neo 2 ची माहिती लीक; स्नॅपड्रॅगन चिपसेटसह येणार हा फ्लॅगशिप फोन  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 07:07 PM2021-09-15T19:07:34+5:302021-09-15T19:07:43+5:30

Realme GT Neo 2 Launch: Realme GT Neo 2 स्मार्टफोन लवकरच बाजारात येणार आहे, आता कंपनीने या फोनमधील प्रोसेसर आणि बॅटरीचा खुलासा केला आहे.  

Realme gt neo 2 will launch with snapdragon 870 and 5000mah battery 65w fast charging   | लाँच होण्याआधी Realme GT Neo 2 ची माहिती लीक; स्नॅपड्रॅगन चिपसेटसह येणार हा फ्लॅगशिप फोन  

लाँच होण्याआधी Realme GT Neo 2 ची माहिती लीक; स्नॅपड्रॅगन चिपसेटसह येणार हा फ्लॅगशिप फोन  

googlenewsNext

Realme GT Neo 2 ची लाँच डेट कंपनीने आधीच सांगितली आहे. हा फोन 23 सप्टेंबरला चीनमध्ये लाँच केला जाईल. या फोनमध्ये एक नवीन चिपसेट दिला जाईल, ज्याची माहिती कंपनीने लाँचपूर्वीच विबो पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. Realme GT Neo 2 स्मार्टफोन कंपनी Snapdragon 870 SoC चिपसेटसह सादर करेल. यावर्षी मार्चमध्ये सादर झालेल्या Realme GT Neo मध्ये MediaTek Dimensity 1200 चिपसेटचा वापर केला होता.  

Weibo पोस्टवरून Realme GT Neo 2 मधील बॅटरीची माहिती देखील मिळाली आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत मोठी बॅटरी मिळणार आहे. हा फोन 5,000mAh च्या बॅटरीसह बाजारात येईल. ही बॅटरी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. ही बॅटरी फक्त 36 मिनिटांत फुल चार्ज होईल.  

Realme GT Neo 2 चे स्पेसिफिकेशन्स  

Realme GT Neo 2 मध्ये 6.62 इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात येईल. या पंच होल डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. फ्रंटला डावीकडे वरच्या बाजूला असेलेल्या या पंच होलमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात येईल. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल, त्यामुळे फोनमधील डिस्प्ले अ‍ॅमोलेड पॅनल असू शकतो. GT Neo 2 रेंडर्समध्ये कुठेही 3.5mm हेडफोन जॅक दिसत आहे. परंतु सिम ट्रे स्लॉट, टाइप-सी पोर्ट आणि स्पिकर ग्रिल फोनच्या तळाला देण्यात आले आहेत. उजवीकडे वॉल्यूम कंट्रोल बटण तर पावर बटण डावीकडे आहे.   

मिळालेल्या माहितीनुसार, हा फोन स्नॅपड्रॅगन 870 SoC सह येईल. तसेच या रियलमी फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात येईल. Realme GT Neo 2 डिवाइस अँड्रॉइड 11-आधारित Realme UI 2.0 वर चालेल. तसेच या फोनमधील 5,000 एमएएचची बॅटरी 65W फास्ट चार्जिंगसह सादर केली जाऊ शकते. या फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64MP चा मुख्य कॅमेरा, 8MP चा अल्ट्रावाईड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळेल.  

Web Title: Realme gt neo 2 will launch with snapdragon 870 and 5000mah battery 65w fast charging  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.