जबरदस्त Realme GT Neo 2T चा फर्स्ट लुक आला समोर; वनप्लसला देणार का टक्कर?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 07:00 PM2021-10-12T19:00:32+5:302021-10-12T19:00:40+5:30
Realme GT Neo 2T Specifications Launch Sale: Realme GT Neo 2T चा फर्स्ट लूक कंपनीने टीज केला आहे. रियलमीने या फोनचा व्हाईट कलर व्हेरिएंट जगासमोर ठेवला आहे.
रियलमी लवकरच आपल्या GT-series अंतर्गत नवीन स्मार्टफोन लाँच करणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. हा फोन या महिन्यात चीनमध्ये Realme GT Neo 2T नावाने सादर केला जाऊ शकतो. 19 ऑक्टोबरला चीनमध्ये सादर झाल्यानंतर हा फोन भारतीय बाजारात देखील दाखल होऊ शकतो. कारण आता हा फोन कंपनीच्या भारतीय वेबसाईटवर दिसला आहे.
Realme GT Neo 2T ची डिजाईन
Realme GT Neo 2T स्मार्टफोन व्हाईट कलर व्हेरिएंट लाँचपूर्वी कंपनीने टीज केला आहे. या टीजरनुसार हा फोन मॅट फिनिश रियर पॅनलसह सादर केला जाऊ शकतो. या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. यात 64MP प्रायमरी कॅमेरा, अल्ट्रा वाईड सेन्सर आणि मॅक्रो किंवा ब्लॅक अँड व्हाइट लेन्स मिळू शकते.
या फोनच्या बॉटमला 3.5mm हेडफोन जॅक, USB Type-C चार्जिंग पोर्ट, मायक्रोफोन आणि स्पिकर ग्रिल देण्यात आला आहे. तसेच डाव्या बाजूला पॉवर बटण, वॉल्यूम बटण आणि SIM स्लॉट मिळेल.
Realme GT Neo 2T चे लीक झालेले स्पेसिफिकेशन्स
लिक्स आणि रिपोर्ट्समधून रियलमी जीटी नियो 2टी चे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. त्यानुसार कंपनी हा फोन 6.43 इंचाच्या फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्लेसह सादर करू शकते. हा फोन अँड्रॉइड 11 ओएससह बाजारत दाखल होईल. ज्यात मीडियाटेक डिमेनसिटी 1200 चिपसेट दिला जाऊ शकतो. सोबत 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.
फोटोग्राफीसाठी या डिवाइसच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. ज्यात 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलचा दुसरा सेन्सर व 2 मेगापिक्सलचा तिसरा सेन्सर असेल. या फोनमधील सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा असेल. आगामी Realme GT Neo 2T मधील 4,500एमएएच बॅटरी 65वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.