10 सेकंदात 1 लाख फोन्सची विक्री; सॅमसंग- शाओमी नव्हे तर ‘या’ कंपनीनं दाखवली ताकद  

By सिद्धेश जाधव | Published: March 31, 2022 12:48 PM2022-03-31T12:48:25+5:302022-03-31T12:48:37+5:30

काही दिवसांपूर्वी चीनमध्ये Realme GT Neo 3 स्मार्टफोन लाँच झाला होता. त्यानंतर कंपनीनं या फोनचा पहिला सेल आयोजित केला होता.

Realme GT Neo 3 Smartphone Breaks Record In First Sale In China   | 10 सेकंदात 1 लाख फोन्सची विक्री; सॅमसंग- शाओमी नव्हे तर ‘या’ कंपनीनं दाखवली ताकद  

10 सेकंदात 1 लाख फोन्सची विक्री; सॅमसंग- शाओमी नव्हे तर ‘या’ कंपनीनं दाखवली ताकद  

googlenewsNext

Realme GT Neo 3 स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. परंतु त्याआधी हा फोन चीनमध्ये लाँच झाला आहे. तिथे या स्मार्टफोनला अविश्वसनीय प्रतिसाद मिळत आहे. इतका की, पहिल्या सेलच्या सुरुवातीच्या 10 सेकंदांत फोनचे 1 लाखांपेक्षा जास्त युनिट्स विकले गेले, अशी माहिती कंपनीनं सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे.  

काही दिवसांपूर्वी चीनमध्ये Realme GT Neo 3 स्मार्टफोन लाँच झाला होता. त्यानंतर कंपनीनं या फोनचा पहिला सेल आयोजित केला होता. या सेलमध्ये 10 तासांत 120 मिलियल युआन (सुमारे 143.42 कोटी रुपये) किंमतीचे युनिट्स विकले गेले. यात कोणत्या व्हेरिएंट्सचे किती युनिट्स विकले गेले याची माहिती कंपनीनं दिली नाही. परंतु पहिल्या 10 सेकंदात 1 लाखांपेक्षा जास्त Realme GT Neo 3 स्मार्टफोन्सची विक्री झाली, असं कंपनीनं सांगितलं आहे.  

Realme GT Neo 3 चे स्पेसिफिकेशन्स  

Realme GT Neo 3 मध्ये अँड्रॉइड 12 ओएस आधारित रियलमी युआय 3.0 आहे. प्रोसेसिंगसाठी कंपनी मीडियाटेक डिमेनसिटी 8100 चिपसेट आणि ग्राफिक्ससाठी माली जी610 जीपीयूचा वापर करण्यात आला आहे. सोबत 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते. 

रियलमी जीटी नियो 3 टेक मंचावर 6.7 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह आला आहे. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1000हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या पंच-होल पॅनलला कोर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा आहे. 

Realme GT Neo 3 च्या मागे असेल्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर मिळतो. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा टेली मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात इन-डिस्प्ले फिंगर सेन्सरची सुरक्षा मिळते.  

Realme GT Neo 3 चे वेगवेगळ्या बॅटरी आणि चार्जिंग स्पीडचे दोन मॉडेल आहेत. यातील 4,500एमएएचच्या बॅटरीसह 150वॉट फास्ट चार्जिंग मिळते. तर 5,000एमएएच बॅटरी असलेला मॉडेल 80वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. 

 

Web Title: Realme GT Neo 3 Smartphone Breaks Record In First Sale In China  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.