12 मिनिटांत बॅटरी फुल! Realme GT Neo 3T ची लाँच डेट आली समोर, 64MP कॅमेऱ्यासह घेणार एंट्री
By सिद्धेश जाधव | Published: June 21, 2022 11:49 AM2022-06-21T11:49:01+5:302022-06-21T11:49:07+5:30
Realme GT Neo 3T स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती समोर आली आहे.
Realme GT Neo 3T स्मार्टफोन जागतिक बाजारात आल्यापासून कंपनीचे चाहते या स्मार्टफोनची वाट बघत आहेत. आता 91मोबाईल्सच्या रिपोर्टमधून या हँडसेटच्या भारतीय लाँचची माहिती मिळाली आहे. जागतिक बाजारात हा फोन 80W फास्ट चार्जिंग, 5000mAh ची बॅटरी, 64MP कॅमेरा, Snapdragon 870 प्रोसेसर आणि 120Hz रिफ्रेश रेटसह सादर करण्यात आला आहे.
रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन भारतात या महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला सादर केला जाऊ शकतो. रियलमीच्या आगामी स्मार्टफोनच्या स्टोरेज व्हेरिएंट्सची माहिती देखील देण्यात आली आहे. त्यानुसार स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट भारतात दाखल होतील. बेस व्हेरिएंट 6 जीबी रॅम व 128जीबी स्टोरेजसह येईल. तर 8 जीबी रॅम व 128 जीबी मेमरी आणि 8 जीबी रॅम 256 जीबी मेमरी असलेले दोन मॉडेल येतील. तसेच फोन डॅश यलो, ड्रिफ्टिंग व्हाईट आणि शेड ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात येईल.
Realme GT Neo 3T चे स्पेसिफिकेशन्स
Realme GT Neo 3T मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या चार्जिंग स्पीडमुळे फोन 0 ते 50 टक्के चार्ज होण्यासाठी 12 मिनिटं लागतात, असा दावा करण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.62 इंचाचा E4 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,300 nits ब्राईटनेसला सपोर्ट करतो.
Realme GT Neo 3T फोन Android 12 OS बेस्ड Realme UI 3.0 वर चालतो. फोनमध्ये Snapdragon 870 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत एकूण 13GB म्हणजे 8GB RAM आणि 5GB व्हर्च्युअल RAM देण्यात आला आहे. फोनमध्ये 128GB मेमरी मिळते. फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप 64MP च्या मुख्य कॅमेऱ्यासह मिळतो. ज्यात 8MP चा अल्ट्रा-वाईड सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा कॅमेरा मिळतो.