12GB रॅमसह Realme GT Neo 3T घेणार एंट्री; कंपनीनं दाखवली जबरदस्त डिजाईन
By सिद्धेश जाधव | Published: June 3, 2022 06:02 PM2022-06-03T18:02:59+5:302022-06-03T18:03:22+5:30
Realme GT Neo 3T स्मार्टफोन आधी जागतिक बाजारात आणि नंतर भारतात लाँच केला जाऊ शकतो.
Realme GT Neo 3T स्मार्टफोनच्या जागतिक लाँचची तारीख 7 जून ठरवण्यात आली आहे. सोबत 150W फास्ट चार्जिंग असलेला Realme GT Neo 3 देखील सादर केला जाणार आहे. आता Realme GT Neo 3T स्मार्टफोन भारतात देखील लाँच केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. Realme नं अहमदाबादमध्ये पाहिलं ग्लोबल फ्लॅगशिप स्टोर ओपन केलं आहे. स्टोर ओपनिंगच्या निमित्तानं Realme GT Neo 3T स्मार्टफोन पहिल्यांदाच शोकेस करण्यात आला आहे.
Realme GT Neo 3T ची डिजाईन
Realme GT Neo 3T स्मार्टफोनची झलक स्टोर ओपनिंगच्या इव्हेंटमध्ये दाखवण्यात आली आहे. त्यावरून हा फोन चीनमध्ये आलेल्या Realme Q5 Pro चा रिब्रँड व्हर्जन असेल असे दिसत आहे. हा फोन यलो आणि व्हाईट कलर ऑप्शनमध्ये सादर केला गेला आहे. परंतु बॅक पॅनलवरील हनीकॉम्ब डिजाइन स्मार्टफोनची खासियत म्हणता येईल.
संभाव्य स्पेसिफिकेशन्स
गीकबेंच लिस्टिंगनुसार Realme GT Neo 3T स्मार्टफोन 8 जीबी आणि 12 जीबी रॅम ऑप्शनमध्ये सादर केला जाऊ शकतो. सोबत 256 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते आणि यात मायक्रो एसडी कार्डला सपोर्ट मिळणार नाही. हा फोन अँड्रॉइड 12 बेस्ड Realme UI 3.0 वर चालेल. यातील 5000mAh ची बॅटरी 150 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह बाजारात येईल.
फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा असेल. सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. फोनमध्ये 1080x2400 पिक्सल रिजोल्यूशनसह 6.62 इंचाचा फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले मिळेल. जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतात Realme GT Neo 3T स्मार्टफोन 35 हजार रुपयांच्या आसपास सादर केला जाऊ शकतो.