Snapdragon 888 असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन Realme GT येणार भारतात; सीईओने सांगितला संपूर्ण प्लॅन

By सिद्धेश जाधव | Published: June 19, 2021 11:31 AM2021-06-19T11:31:49+5:302021-06-19T11:33:15+5:30

Realme GT India Launch: Realme GT भारतात दिवाळीपूर्वी लाँच केला जाईल, तर रियलमी लॅपटॉपस यावर्षी देशात सादर करण्यात येतील.  

Realme gt with snapdragon 888 chipset to launch in india soon  | Snapdragon 888 असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन Realme GT येणार भारतात; सीईओने सांगितला संपूर्ण प्लॅन

Realme GT 5G हा स्नॅपड्रॅगन 888 या फ्लॅगशिप चिपसेटसह लाँच झालेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे.

googlenewsNext

Realme ने काही दिवसांपूर्वी युरोपियन बाजारात Realme GT 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्नॅपड्रॅगन 888 या फ्लॅगशिप चिपसेटसह लाँच झालेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. हा फोन दिवाळीच्या काही दिवस आधी भारतात लाँच केला जाईल, अशी माहिती रियलमीचे सीईओ माधव सेठ यांनी दिली आहे. युट्युबवरील AskMadhav या प्रोग्रॅमच्या माध्यमातून माधव सेठ यांनी रियलमी जीटी आणि इतर काही प्रॉडक्ट्सची माहिती दिली आहे. यात त्यांनी Realme Laptop आणि Realme Pad टॅबलेट संबंधित माहिती दिली आहे. (Realme CEO answers question realted to Realme GT India launch and realme laptop) 

Realme Laptop आणि Trimmer होतील लाँच 

Realme GT च्या ग्लोबल लाँचच्या वेळी कंपनीने Realme Laptop ची झलक दाखवली होती. हा लॅपटॉप याच वर्षी लाँच केला जाईल अशी माहिती, माधव सेठ यांनी दिली आहे. त्याचबरोबर कंपनी आपला प्रॉडक्ट पोर्टफोलियो वाढवत पुढल्या महिन्यात भारतात ट्रीमर देखील लाँच करणार आहे.  

Realme GT दिवाळीच्या आधी होईल लाँच  

Realme GT स्मार्टफोन कंपनीने काही दिवसांपूर्वी युरोपात लाँच केला होता. रियलमीचा दमदार स्मार्टफोन भारतात दिवाळीच्या आधी लाँच होईल. Qualcomm Snapdragon 888 चिपसेटसह लाँच होणाऱ्या या सर्वात स्वस्त फोनच्या मध्यातून दिवाळीत मोठा धमाका करण्याची योजना कंपनी बनवत आहे.  

Realme X7 Max मिल्की वे व्हेरिएंट  

Realme X7 Max स्मार्टफोनचा नवीन कलर व्हेरिएंट मिल्की वे 24 जूनपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल, असे माधव सेठ यांनी सांगितले.  

Narzo चे अस्तित्व?  

नारजो एक स्वतंत्र ब्रँड म्हणून समोर येईल अशी चर्चा नारजोच्या सुरुवातीपासून आहे. त्याविषयी बोलताना माधव सेठ यांनी म्हटले आहे कि सध्यातरी नारजो स्वतंत्र ब्रँड बनणार नाही. नारजो अंतर्गत परफॉर्मन्स सेंट्रिक फोन्स लाँच करणे सुरु राहील, अशी माहिती त्यांनी दिली.  

Web Title: Realme gt with snapdragon 888 chipset to launch in india soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.