Apple-Samsung राहिले मागे! Realme नं सुरु केली काही मिनिटांत चार्ज होणाऱ्या स्मार्टफोनची तयारी
By सिद्धेश जाधव | Published: February 12, 2022 03:47 PM2022-02-12T15:47:23+5:302022-02-12T15:48:03+5:30
Realme आपल्या पहिल्या 150W फास्ट चार्जिंग असलेल्या स्मार्टफोनवर काम करत आहे. विशेष म्हणजे अॅप्पल आणि सॅमसंग या शर्यतीत कितीतरी मागे राहिले आहेत.
Realme दिवसेंदिवस एकपेक्षा एक भारी स्मार्टफोन्स सादर करत आहे. लवकरच कंपनी आपला अल्ट्रा फ्लॅगशिप स्मार्टफोन Realme GT 2 Pro भारतात सादर करणार आहे. तर आता कंपनी आपल्या पहिल्या 150W फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेल्या स्मार्टफोनवर काम करत आहे. आतापर्यंत सादर झालेल्या स्मार्टफोन्समध्ये 120W हा चार्जिंगचा सर्वाधिक स्पीड आहे.
Realme चा 150W चार्जिंग स्पीड असलेला स्मार्टफोन
टिपस्टर Digital Chat Station नं चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. रियलमीकडे 80W आणि 150W सुपर फ्लॅश चार्जिंगच्या मशीन असतील, असं पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे. तसेच लवकरच मीडियाटेकचा Dimensity 8000 चिपसेट येणार आहे, असं देखील टिपस्टरनं सांगितलं आहे.
चार्जिंग स्पीडमध्ये अँड्रॉइड आघाडीवर
जेव्हा चार्जिंग स्पीडचा प्रश्न येतो तेव्हा अँड्रॉइड स्मार्टफोन्स आघाडीवर दिसतात. अॅप्पलची आयफोन 13 सीरिज 29W स्पीडसह सादर करण्यात आली आहे. तर अँड्रॉइडमध्ये शाओमी, आयकू आणि ओप्पोनं 120W स्पीडसह काही स्मार्टफोन्स सादर केले आहेत. सॅमसंगच्या स्मार्टफोनमध्ये मात्र 45W पेक्षा जास्त चार्जिंग स्पीड मिळालेला नाही.
हे देखील वाचा:
- आधी स्वभाव जाणून घ्या मग 'डेट करा'; Valentine’s Day च्या आधी Tinder मध्ये आलं भन्नाट ‘Blind Date’ फीचर
- हे आहेत 6 'बेस्ट' पासवर्ड मॅनेजर अॅप्स जे तुम्हाला कधीच विसरू देणार नाहीत महत्वाचे लॉगिन डिटेल्स