Realme उघडला प्रोडक्टचा पेटारा! 4K Smart Google TV Stick, Realme Brick ब्लूटूथ स्पिकरसह गेमिंग अॅक्सेसरीज भारतात लाँच
By सिद्धेश जाधव | Published: October 13, 2021 06:34 PM2021-10-13T18:34:25+5:302021-10-13T18:35:14+5:30
Realme 4K Smart Google TV Stick Price In India: रियलमीने Realme 4K Smart Google TV Stick, Realme Brick Bluetooth Speaker आणि तीन नवीन स्मार्टफोन गेमिंग अॅक्सेसरीज भारतात सादर केल्या आहेत.
रियलमीने भारतात Realme GT Neo 2 स्मार्टफोनसह अनेक प्रोडक्ट आज भारतात सादर केले आहेत. यात Realme 4K Smart Google TV Stick, Realme Brick Bluetooth Speaker आणि तीन नवीन स्मार्टफोन गेमिंग अॅक्सेसरीजच समावेश आहे. तसेच कंपनीने Realme Buds Air 2 चा नियो कलर व्हेरिएंट देखील देशात लाँच केला आहे.
Realme 4K Smart Google TV Stick
Realme 4K Smart Google TV Stick हा कंपनीचा देशातील पहिला स्ट्रीमिंग डिवाइस आहे. या स्टिकच्या मदतीने नॉन-स्मार्ट टीव्हीला स्मार्ट टीव्ही बनवता येईल. ही 4K स्मार्ट स्टिक 60fps आणि HDR10+ व्हिडीओ स्ट्रीमला सपोर्ट करते. टीव्हीला कनेक्ट करण्यासाठी HDMI 2.1 पोर्टचा वापर करावा लागेल. यात Google Play Store, Play services, Google Assistant आणि बिल्ट इन क्रोमकास्ट अशा गुगल सर्व्हिस मिळतात.
या टीव्ही स्टिकमध्ये 2GB RAM आणि 8GB स्टोरेज देण्यात आली आहे. त्याचबरोबर ARM Cortex-A35 CPU, आणि ड्युअल कोर GPU मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात Bluetooth 5, Wi-Fi, आणि इन-बिल्ट मायक्रोफोन असलेला रिमोट देण्यात आला आहे. Realme 4K Smart Google TV Stick ची किंमत 3,999 रुपये ठेवण्यात आली आहे. लाँच ऑफर अंतगर्त Flipkart आणि Realme.com वरून हा डिवाइस 2,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Realme Brick Bluetooth Speaker
20W डायनॅमिक बेस बूस्ट ड्राईव्हरसह कंपनीने Realme Brick ब्लूटूथ स्पिकर सादर केले आहेत. 360-डिग्री स्टीरियो साउंड इफेक्टसह सादर करण्यात आलेले हे स्पीकर 5,200mAh च्या बॅटरीसह बाजारात आले आहेत. यात सिंगल चार्जमध्ये 14 तासांचा बॅकअप मिळतो. Realme Brick Bluetooth Speaker ची किंमत 2,999 रुपये आहे.
Realme गेमिंग अॅक्सेसरीज
रियलमीने भारतीय बाजारात तीन नवीन गेमिंग अॅक्सेसरीज सादर केल्यात आहेत. यात Realme cooling back clip Neo, Type-C SuperDart गेमिंग केबल आणि मोबाईल गेमिंग ट्रिगरचा समावेश आहे. नायलॉन मटेरियलपासून बनलेल्या गेमिंग केबलची खासियत म्हणजे यात 7.6mm नॅरो एल्बो डिजाइन देण्यात आली आहे. जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Type-C SuperDart गेमिंग केबलची किंमत 599 रुपये आहे.
गेमिंग ट्रिगर जिंक अलॉय मटेरियलपासून बनवण्यात आले आहेत, जे लेटेंसी फ्री गेमिंगचा अनुभव देतात. या मोबाईल गेमिंग ट्रिगरची किंमत 699 रुपये आहे. तर रियलमीची कूलिंग क्लिप रॅपिड कूलिंग देतात, ज्याची किंमत 999 रुपये आहे.