Realme Narzo 30 सिरीजचे दोन जबरदस्त फोन लवकरच भारतात होणार लाँच; उत्सुकता वाढली!

By सिद्धेश जाधव | Published: June 14, 2021 04:21 PM2021-06-14T16:21:50+5:302021-06-14T16:34:00+5:30

Realme Narzo 30: Realme चे सीईओ माधव सेठ यांनी Realme Narzo 30 सिरीज जूनमध्ये भारतात लाँच होईल अशी माहिती दिली आहे.  

Realme Narzo 30 5G official launch in india in june confirm  | Realme Narzo 30 सिरीजचे दोन जबरदस्त फोन लवकरच भारतात होणार लाँच; उत्सुकता वाढली!

हा फोटो realme Narzo 30 Pro चा आहे

Next

Realme भारतात आपली ‘नारजो’ सीरीज वाढवणार आहे आहे आणि या सीरीजअंतगर्त याच महिन्यात दोन नवीन स्मार्टफोन Realme Narzo 30 आणि Realme Narzo 30 5G लाँच केले जातील. कंपनीचे सीईओ माधव सेठ यांनी हि माहिती दिली आहे. माधव यांनी युट्युब सत्र ‘आस्क माधव’ मध्ये  प्रश्नांची उत्तरे देताना सांगितले क, कंपनी नारजो 30 सीरीजमध्ये अजून दोन नवीन स्मार्टफोन जोडणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन कमी किंमतीत बाजारात येतील. हे दोन्ही फोन जागतिक बाजारात लाँच झाल्यामुळे यांचे स्पेसिफिकेशन्स आधीच समोर आले आहेत. (Realme Narzo 30 series will launch in June in India confirms CEO) 

Realme Narzo 30 5G चे स्पेसिफिकेशन्स 

आंतरराष्ट्रीय बाजारात रियलमी नारजो 30 5जी MediaTek Dimensity 700 चिपसेटसह लाँच केला गेला आहे. तसेच, फोनमध्ये 4 GB RAM सह 64 GB आणि 128 GB स्टोरेजचे पर्याय आहेत. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. रियलमीचा हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित Realme UI 2.0 वर चालतो. 

Realme Narzo 30 5G स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. तर, मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे.  

Realme Narzo 30 4G चे स्पेसिफिकेशन्स 

रियलमी नारजो 30 बद्दल बोलायचे झाले तर, हा फोन 6.5-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच केला गेला आहे. हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G95 गेमिंग प्रोसेसर आणि 900MHz Mali-G76GPU आहे. तसेच, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन 30वॉट डार्ट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येणाऱ्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. 

फोटोग्राफीसाठी या फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 2MP B&W पोर्टेट कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. तसेच, व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP चा सेल्फी शुटर देण्यात आला आहे.  

Web Title: Realme Narzo 30 5G official launch in india in june confirm 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.