रियलमीचा स्वस्त 5G फोनचा पहिला सेल आज; अशाप्रकारे मिळावा Realme Narzo 30 5G वर 500 रुपयांची सूट 

By सिद्धेश जाधव | Published: June 30, 2021 11:33 AM2021-06-30T11:33:03+5:302021-06-30T11:33:56+5:30

Realme Narzo 30 5G Price: Realme Narzo 30 5G मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. 

Realme narzo 30 5g realme buds q2 to go on first sale today at 12 noon check prices exciting offers here  | रियलमीचा स्वस्त 5G फोनचा पहिला सेल आज; अशाप्रकारे मिळावा Realme Narzo 30 5G वर 500 रुपयांची सूट 

Realme Narzo 30 5G चा भारतात फक्त एकच व्हेरिएंट लाँच करण्यात आला आहे.

googlenewsNext

काही दिवसांपूर्वी रियलमीने नारजो 30 सीरिज भारतात लाँच केली होती. यातील Realme Narzo 30 5G स्मार्टफोन आणि Realme Buds Q2 ट्रू व्हायरलेस स्टीरियो इयरफोन आज पहिल्यांदा खरेदीसाठी उपलब्ध होतील. हे डिवाइस आज दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून विकत घेता येतील. (Realme Narzo 30 5G & Realme Buds Q2 To Go on First Sale Today at 12 Noon, Check Prices & Exciting Offers Here) 

Realme Narzo 30 5G ची किंमत  

Realme Narzo 30 5G चा भारतात फक्त एकच व्हेरिएंट लाँच करण्यात आला आहे. याची किंमत 15,999 रुपये ठेवण्यात आली आहे, यात 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट मिळते. Realme.com वेबसाइटवर तुम्हाला या फोनवर 500 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. हा फोन Flipkart वर देखील उपलब्ध आहे.  

Realme Buds Q2 ची किंमत  

Realme Buds Q2 रियलमी नार्जो 30 5जी सह लाँच करण्यात आले होते. हे इयरबड्स भारतात 2,499 रुपयांमध्ये Realme.com, Amazon आणि निवडक रिटेलर स्टोर्सवर आजपासून उपलब्ध होतील.  

Realme Narzo 30 5G चे स्पेसिफिकेशन्स  

Realme Narzo 30 5G मध्ये कंपनीने 6.5 इंचाचा 2400×1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल FHD+ डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेकच्या Dimensity 700 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे. फोन 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज मिळते. Narzo 30 5G मध्ये 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने Android 11 आधारित Realme UI 2.0 दिला आहे.   

Realme Narzo 30 5G च्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. सोबत मॅक्रो आणि ब्लॅक अँड व्हाइट कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत. हा फोन 16 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यासह येतो. 

Realme Buds Q2 चे स्पेसिफिकेशन्स  

Realme Buds Q2 इन-इयर डिजाईनसह लाँच करण्यात आले आहेत. अशीच डिजाईन Realme Buds Q मध्ये देखील देण्यात आली होती. या नवीन बड्समध्ये Bass Boost+ टेक्नॉलॉजी बेस वाढवते. यात 10mm चे डायनॅमिक ड्रॉयव्हर्स देण्यात आले आहेत, हे ड्रॉयव्हर्स पॉलिमर कंपॉजिट डायफ्रेमसह येतात. हे इयरबड्स चार्जिंग केसच्या मदतीने 24 तासांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतात, असा दावा रियलमीने केला आहे.   

Realme Buds Q2 मधील गेम मोड 88ms लो-लेटेंसीसह येतो. या इयरबड्समध्ये म्युजिक कंट्रोल्स देण्यात आले आहेत, तसेच गेमिंग मोडमध्ये जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी देखील टच कंट्रोल देण्यात आले आहेत. या बड्समध्ये अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन मिळते

Web Title: Realme narzo 30 5g realme buds q2 to go on first sale today at 12 noon check prices exciting offers here 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.