रेडमीची झोप उडवण्याचा डाव रचतेय Realme; बजेट सेगमेंटमध्ये फाडू स्मार्टफोनची होणार एंट्री
By सिद्धेश जाधव | Published: February 15, 2022 08:58 PM2022-02-15T20:58:43+5:302022-02-15T20:58:50+5:30
Realme Narzo 50 भारतात लवकरच लाँच होणार आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या Amazon लिस्टिंगमधून या लाँचचा खुलासा झाला आहे.
Realme Narzo 50 स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. हा फोन काही दिवसांपूर्वी भारतीय सर्टिफिकेशन साईट BIS वर लिस्ट झाला होता. कंपनीचे सीईओ माधव सेठ यांनी देखील या स्मार्टफोनच्या लाँचशी महतीती दिली होती. आता आलेल्या माहितीनुसार, रियलमीचा हा आगामी स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाईट Amazon वरून विकत घेता येईल. तसेच रॅम, स्टोरेज आणि कलर व्हेरिएंटचा देखील खुलासा झाला आहे.
Realme Narzo 50 लाँच डेट?
91Mobiles च्या रिपोर्टनुसार, टिपस्टर योगेश ब्रारनं Realme Narzo 50 स्मार्टफोन Amazon वर दिसला आहे. ही लिस्टिंग सध्या उपलब्ध नाही. हा पहिलाच रियलमी फोन असेल जो अॅमेझॉनवर उपलब्ध होईल, कारण साधरणतः रियलमीचे स्मार्टफोन एक्सक्लूसिवली ई-कॉमर्स वेबसाईट Flipkart वर उपलब्ध होतात. हा फोन मार्चमध्ये ग्रे आणि ग्रीन कलरमध्ये उपलब्ध होऊ शकतो. अॅमेझॉनवर लिस्टिंगवरून यातील 50MP मेन कॅमेऱ्याची माहिती मिळाली आहे.
Realme Narzo 50 चे संभाव्य स्पेक्स
या स्मार्टफोनचे दोन कलर आणि रॅम ऑप्शन भारतात येतील. या बेस मॉडेलमध्ये 4GB RAM सह 64GB स्टोरेज मिळेल. तर टॉप व्हेरिएंट 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह बाजारात येईल. EEC सर्टिफिकेशननुसार, डिवाइसमध्ये 4880mAh ची बॅटरी देण्यात येईल. हा 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.