Narzo 40 सीरिज कुठे गेली? थेट Realme Narzo 50A 4G भारतीय वेबसाईटवर लिस्ट 

By सिद्धेश जाधव | Published: August 23, 2021 12:30 PM2021-08-23T12:30:08+5:302021-08-23T12:37:15+5:30

Realme Narzo 50a 4G: Realme Narzo 30 सीरीजनंतर थेट Narzo 50 सीरिज भारतीयांच्या भेटीला येणार आहे. Realme Narzo 50A 4G स्मार्टफोन सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट करण्यात आला आहे.

Realme narzo 50a 4gs bis and nbtc certification launch soon  | Narzo 40 सीरिज कुठे गेली? थेट Realme Narzo 50A 4G भारतीय वेबसाईटवर लिस्ट 

Narzo 40 सीरिज कुठे गेली? थेट Realme Narzo 50A 4G भारतीय वेबसाईटवर लिस्ट 

Next
ठळक मुद्देRealme Narzo 50A 4G स्मार्टफोन सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट करण्यात आला आहे. चिनमध्ये 4 अंक अशुभ मानला जातो, त्यामुळे स्मार्टफोन कंपन्या हा अंक असणारे प्रोडक्टस सादर करत नाहीत. रजो लाईनअप प्रमाणे यात देखील Narzo 50A, Narzo 50 आणि Narzo 50 Pro स्मार्टफोन दिसू शकतात.

काही दिवसांपूर्वी Realme ने भारतात आपली फ्लॅगशिप सीरिज Realme GT लाँच केली होती. या सीरिजच्या लाँचनंतर कंपनी आपली Realme X सीरिज भारतात बंद करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता असेच काहीसे Narzo 40 सीरिज सोबत होणार आहे. कंपनीने फेब्रुवारीमध्ये Narzo 30 सीरिज भारतीय बाजारात दाखल केली होती. परंतु आता थेट Narzo 50 सीरीजच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. Narzo 50A 4G नावाचा स्मार्टफोन भारत आणि थायलंडमध्ये सर्टिफाईड करण्यात आला आहे. यामुळे कंपनी Narzo 40 सीरीजला डच्चू देऊ शकते, अशी चर्चा आहे.  

Realme Narzo 50A 4G ची लिस्टिंग 

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) आणि NBTC थायलंड या दोन सर्टिफिकेशन वेबसाईटवर RMX3430 मॉडेल नंबरसह एक Realme स्मार्टफोन लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमधील हा एक 4G LTE फोन आहे, जो Realme Narzo 50A 4G नावाने सादर केला जाऊ शकतो.  हे देखील वाचा: सावधान! नुकताच लाँच झालेला स्मार्टफोन होऊ लागलाय Over Heat; व्हिडीओ बनवताना येतेय समस्या

सीरिज सोडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील कंपनीने Realme 4 किंवा Realme X4/X40 नावाचे हँडसेट सादर केले नव्हते. चिनमध्ये 4 अंक अशुभ मानला जातो, त्यामुळे स्मार्टफोन कंपन्या हा अंक असणारे प्रोडक्टस सादर करत नाहीत. कदाचित म्हणूनच Narzo 30 सीरीजनंतर Narzo 50 सीरीज बाजारात येऊ शकते. गेल्यावर्षीच्या Narzo 20 प्रमाणे Narzo 50 देखील सप्टेंबर महिन्यात सादर केली जाऊ शकते.  हे देखील वाचा: LG इलेक्ट्रॉनिक्सची 6G ची चाचणी यशस्वी; कंपनीने केला टेराहर्ट्ज (THz) स्पेक्ट्रमचा वापर

लिस्टिंगमधून Realme Narzo 50A 4G स्मार्टफोनच्या स्पेक्सची माहिती देण्यात आली नाही. परंतु आतापर्यंत लाँच झालेल्या नारजो लाईनअप प्रमाणे यात देखील Narzo 50A, Narzo 50 आणि Narzo 50 Pro स्मार्टफोन दिसू शकतात. परंतु कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.  

Web Title: Realme narzo 50a 4gs bis and nbtc certification launch soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.