‘हा’ असेल Realme चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, मिळेल दिवसभर पुरणारी मोठी बॅटरी
By सिद्धेश जाधव | Published: June 18, 2022 04:03 PM2022-06-18T16:03:11+5:302022-06-18T16:08:05+5:30
Realme Narzo 50i Prime स्मार्टफोनमध्ये कंपनी 5000mAh ची मोठी बॅटरी देऊ शकते. .
रियलमी आपल्या स्वस्त स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते. सध्या कंपनी भारतात खूप वेगानं मार्गक्रमण करत आहे. लागोपाठ फ्लॅगशिप, मिडरेंज आणि बजेट स्मार्टफोन सादर करत आहे. लवकरच Realme Narzo 50i Prime नावाचा हँडसेट ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. 91मोबाईल्सनं टिपस्टर Onleaks च्या हवाल्याने आगामी रियलमी स्मार्टफोनची माहिती दिली आहे.
Realme Narzo 50i Prime ची किंमत आणि उपलब्धता
रिपोर्टनुसार Realme Narzo 50i Prime स्मार्टफोन 100 डॉलर्समध्ये सादर केला जाऊ शकतो. ही किंमत भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित केल्यास 7,800 रुपयांच्या आसपास आहे. या किंमतीवरून हा एक एंट्री लेव्हल स्मार्टफोन असेल, असा अंदाज लावला जात आहे. तसेच हा 2022 मधील कंपनीच्या सर्वात स्वस्त फोन्स पैकी एक असू शकतो. रियलमी नारजो 50आय प्राईम कंपनी रियलमी सी30 लाँचनंतर लगेचच सादर करणार आहे. 20 जूनला सी30 मॉडेल भारतात आल्यानंतर 22 जूनला नारजो सीरिजचा फोन येईल. हा फोन काळ्या आणि हिरव्या रंगात उपलब्ध होईल.
Realme Narzo 50i Prime चा लूक
Realme Narzo 50i Prime मधील स्पेसिफिकेशन्सची जास्त माहिती मिळाली नाही. फक्त फोनमध्ये कंपनी 5000mAh ची मोठी बॅटरी देणार असल्याचं समजतं. परंतु फोनच्या डिजाईनची माहिती समोर आली आहे. फ्रंटला फुल व्यू डिस्प्ले मिळेल. जो पातळ बेजलसह येईल परंतु खालच्या बाजूला चीन पार्ट मिळेल. आगामी रियलमी स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉचसह येईल.
फोन बॉक्स डिजाइनसह बाजारात येऊ शकतो. मागच्या बाजूला पॅटर्न डिजाइन मिळेल. तर वरच्या बाजूला आयताकृती कॅमेरा मॉड्यूल दिसतो. कडेला नारजोची ब्रँडिंग दिसत आहे. फोनमध्ये एकच कामेच सेन्सर मोठ्या रिंगमध्ये मिळेल. सोबत एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. उजव्या बाजूला वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन आहे. तर डाव्या नाजूक सिम कार्ड स्लॉट दिसत आहे.