6GB RAM सह Realme चा बजेट फ्रेंडली फोन सज्ज; 4 शानदार कॅमेऱ्यांसह येणार बाजारात

By सिद्धेश जाधव | Published: December 20, 2021 05:17 PM2021-12-20T17:17:05+5:302021-12-20T17:21:11+5:30

Realme Narzo 9i: Realme Narzo 9i स्मार्टफोनला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटची ताकद दिली जाऊ शकते. सोबत कंपनी ग्राफिक्ससाठी एड्रेनो 610 जीपीयू देऊ शकते.

Realme Narzo 9i RAM Specs Price Leak India launch soon  | 6GB RAM सह Realme चा बजेट फ्रेंडली फोन सज्ज; 4 शानदार कॅमेऱ्यांसह येणार बाजारात

(सौजन्य: 91mobiles आणि Onleaks)

Next

Realme आपल्या ‘नारजो’ सीरीजच्या नव्या फोनवर काम करत आहे. सप्टेंबरमध्ये आलेल्या Narzo 50i स्मार्टफोन नंतर आता या सिरीजमध्ये Realme Narzo 9i नावाचा फोन सादर केला जाईल. आता लाँचपूर्वीच या डिवाइसची डिजाईन, स्पेसिफिकेशन्सची माहिती, टेक वेबसाईट 91मोबाईल्सनं दिली आहे.  

Realme Narzo 9i चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

Realme Narzo 9i स्मार्टफोनला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटची ताकद दिली जाऊ शकते. सोबत कंपनी ग्राफिक्ससाठी एड्रेनो 610 जीपीयू देऊ शकते. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित रियलमी युआय 2.0 वर चालेल. हा फोन 6GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेजसह विकत घेता येईल. या फोनचे दोन स्टोरेज व्हेरिएंट भारतात येतील. तसेच Prism Blue आणि Prism Black असे कलर ऑप्शन्स मिळतील.  

लीक्सनुसार, हा मोबाईल 6.6 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह बाजारात येईल. हा पंच होल डिजाईनसह येणारा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. फोटोग्राफीसाठी रियलमी नारजो 9आय मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर असेलया. आगामी रियलमी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. पॉवर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते जी 33वॉट फास्ट चार्जिंगनं चार्ज करता येईल.  

हे देखील वाचा: 

सावधान! Google वरील ‘या’ चुकांमुळे तुम्हाला होऊ शकतो तुरुंगवास

OnePlus चा स्वस्त फोन भारतीय वेबसाईटवर लिस्ट; 12GB RAM सह येईल बाजारात

Web Title: Realme Narzo 9i RAM Specs Price Leak India launch soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.