iPad ला टक्कर देणार Realme Pad Mini टॅबलेट? लाँच पूर्वीच झाला वेबसाईटवर लिस्ट 

By सिद्धेश जाधव | Published: February 11, 2022 06:31 PM2022-02-11T18:31:03+5:302022-02-11T18:31:19+5:30

Realme Pad Mini लवकरच भारतात 3GB RAM, Android 11 आणि Unisoc प्रोसेसरसह सादर केला जाऊ शकतो.

Realme Pad Mini Tablet To Be Launched Soon  | iPad ला टक्कर देणार Realme Pad Mini टॅबलेट? लाँच पूर्वीच झाला वेबसाईटवर लिस्ट 

iPad ला टक्कर देणार Realme Pad Mini टॅबलेट? लाँच पूर्वीच झाला वेबसाईटवर लिस्ट 

Next

Realme आपल्या टॅबलेट पोर्टफोलियोचा विस्तार करणार असल्याचं दिसत आहे. गेल्यावर्षी आपला पहिला टॅबलेट Realme Pad लाँच केल्यानंतर कंपनी आता या टॅबचा मिनी व्हर्जन सादर करू शकते. रियलमीचा हा नवीन टॅबलेट अनेक सर्टिफिकेशन वेबसाईटवर दिसला आहे. या लिस्टिंगमधून Realme Pad Mini च्या स्पेसिफिकेशन्स बाबत माहिती मिळाली आहे.  

Realme Pad Mini चे लीक स्पेसिफिकेशन्स 

हा टॅबलेट Realme RMP2105 या मॉडेल नंबरसह थायलंडच्या NBTC सर्टिफिकेशन साईटवर दिसला आहे. तसेच BIS सर्टिफिकेशनमुळे  या टॅबचा भारतीय लाँच देखील कन्फर्म झाला आहे. गिकबेंच लिस्टिंगमधून या टॅबलेटच्या UNISOC प्रोसेसर आणि 3GB RAM ची माहिती मिळाली आहे. तसेच हा टॅबलेट अँड्रॉइड 11 ओएससह बाजारात येईल, हे स्पष्ट झालं आहे. Geekbench च्या सिंगल कोर टेस्टमध्ये या टॅबला 363 पॉईंट्स आणि मल्टी कोर टेस्टमध्ये 1,330 पॉईंट्स मिळाले आहेत.  

Realme Pad चे स्पेसिफिकेशन्स   

Realme Pad स्लिम डिजाइन आणि एयरक्राफ्ट ग्रेड अ‍ॅल्युमिनियम बॉडीसह सादर करण्यात आला आहे. या रियलमी टॅबमध्ये बॅक पॅनलवर सिंगल कॅमेरा मिळतो. रियलमी पॅडची जाडी फक्त 6.4mm आणि वजन 440 ग्राम आहे. या टॅबलेटमध्ये 10.4 इंचाचा WUXGA+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 2000X1200 पिक्सल आणि बॉडी टू स्क्रीन रेश्यो 82.5 टक्के आहे. हा टॅब Android 11 आधारित Realme UI वर चालतो.   

प्रोसेसिंगसाठी Realme Pad मध्ये मीडियाटेकचा Helio G80 चिपसेट मिळतो. या टॅबलेटमधील 7100mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 18W क्विक चार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. तसेच रिवर्स चार्जिंग सपोर्टमुळे या टॅबचा वापर पावरबँकप्रमाणे करता येतो. हा टॅब सिंगल चार्जमध्ये 12 तास व्हिडीओ प्लेबॅक आणि 65 दिवस स्टँडबाय टाइम देतो. या रियलमी पॅडमध्ये फ्रंट आणि बॅक पॅनलवर 8MP चा कॅमेरा सेन्सर मिळतो. यारील चार स्पिकर Dolby Atmos आणि अडॅप्टिव सराउंड साउंडला सपोर्ट करतात.   

हे देखील वाचा:

Web Title: Realme Pad Mini Tablet To Be Launched Soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.