स्वस्तात मस्त टॅबलेट लाँच! फक्त 13,999 रुपयांमध्ये Realme Pad भारतात सादर  

By सिद्धेश जाधव | Published: September 9, 2021 04:43 PM2021-09-09T16:43:38+5:302021-09-09T16:49:22+5:30

Realme Pad Price in India: Realme Pad मध्ये कंपनीने मीडियाटेकचा Helio G80 प्रोसेसर, 10.4 इंचाचा सुंदर WUXGA+ डिस्प्ले आणि 7100mAh ची दमदार बॅटरी दिली आहे.  

Realme pad price in india and specifications  | स्वस्तात मस्त टॅबलेट लाँच! फक्त 13,999 रुपयांमध्ये Realme Pad भारतात सादर  

स्वस्तात मस्त टॅबलेट लाँच! फक्त 13,999 रुपयांमध्ये Realme Pad भारतात सादर  

Next
ठळक मुद्देप्रोसेसिंगसाठी Realme Pad मध्ये मीडियाटेकचा Helio G80 चिपसेट मिळतो. लाँच होण्याआधीच Realme Pad फ्लिपकार्टवर लिस्ट झाला होता.

Realme ने टॅबलेट सेगमेंटमध्ये दमदार एंट्री घेतली आहे. कंपनीने आपला सर्वात पहिला टॅब भारतात Realme Pad नावाने सादर केला आहे. आज पार पडलेल्या व्हर्च्युअल इव्हेंटच्या माध्यमातून कंपनीने Realme 8i आणि Realme 8s स्मार्टफोनसह हा टॅब सादर केला आहे. Realme Pad मध्ये कंपनीने मीडियाटेकचा Helio G80 प्रोसेसर, 10.4 इंचाचा सुंदर WUXGA+ डिस्प्ले आणि 7100mAh ची दमदार बॅटरी दिली आहे.  

Realme Pad चे स्पेसिफिकेशन्स  

Realme Pad स्लिम डिजाइन आणि एयरक्राफ्ट ग्रेड अ‍ॅल्युमिनियम बॉडीसह सादर करण्यात आला आहे. या रियलमी टॅबमध्ये बॅक पॅनलवर सिंगल कॅमेरा मिळतो. रियलमी पॅडची जाडी फक्त 6.4mm आणि वजन 440 ग्राम आहे. या टॅबलेटमध्ये 10.4 इंचाचा WUXGA+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 2000X1200 पिक्सल आणि बॉडी टू स्क्रीन रेश्यो 82.5 टक्के आहे. हा टॅब Android 11 आधारित Realme UI वर चालतो.  

प्रोसेसिंगसाठी Realme Pad मध्ये मीडियाटेकचा Helio G80 चिपसेट मिळतो. या टॅबलेटमधील 7100mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 18W क्विक चार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. तसेच रिवर्स चार्जिंग सपोर्टमुळे या टॅबचा वापर पॉवरबँकप्रमाणे करता येतो. हा टॅब सिंगल चार्जमध्ये 12 तास व्हिडीओ प्लेबॅक आणि 65 दिवस स्टँडबाय टाइम देतो. या रियलमी पॅडमध्ये फ्रंट आणि बॅक पॅनलवर 8MP चा कॅमेरा सेन्सर मिळतो. यारील चार स्पिकर Dolby Atmos आणि अडॅप्टिव सराउंड साउंडला सपोर्ट करतात.  

Realme Pad ची किंमत आणि उपलब्धता  

लाँच होण्याआधीच Realme Pad फ्लिपकार्टवर लिस्ट झाला होता. त्यामुळे हा फोन या ईकॉमर्स वेबसाईटसह कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून 16 सप्टेंबरपासून विकत घेता येईल. हा टॅबलेट तीन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. यातील बेस व्हेरिएंट 3GB रॅम आणि 32GB स्टोरेजसह येतो, ज्यात कनेक्टिविटीसाठी WiFi देण्यात आला आहे. हा वाय-वाय व्हेरिएंट 13,999 रुपयांमध्ये काही दिवसानंतर उपलब्ध होईल. 3GB RAM आणि 32GB स्टोरेज LTE मॉडेलची किंमत 15,999 रुपये आणि 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेज LTE व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये ठेवण्यात आली आहे.  

Web Title: Realme pad price in india and specifications 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.