लवकरच बाजारात येणार रियलमी टॅबलेट; Realme Pad ची डिजाइन लीक 

By सिद्धेश जाधव | Published: July 19, 2021 02:56 PM2021-07-19T14:56:13+5:302021-07-19T14:58:09+5:30

Realme Pad Render: Realme Pad चा रेंडर मोठ्या प्रमाणावर 2020 च्या Apple iPad Pro सारखा दिसत आहे.  

Realme pad renders show that the device will feature a built in stylus  | लवकरच बाजारात येणार रियलमी टॅबलेट; Realme Pad ची डिजाइन लीक 

सौजन्य: 91mobiles

Next

चिनी कंपनी रियलमी आपला टॅबलेट लाँच करणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. कंपनी हा टॅबलेट Realme Pad नावाने लाँच करू शकते. आता 91Mobiles आणि @OnLeaks ने या डिवाइसचे रेंडर जारी केले आहेत. या रेंडर्समधून या टॅबलेटची डिजाइन समोर आली आहे, तसेच काही स्पेसिफिकेशन देखील शेयर करण्यात आले आहेत. कंपनीने गेल्या महिन्यात हा डिवाइस टीज केला होता, परंतु कोणतीही लाँच डेट सांगितली नाही. Realme Book (लॅपटॉप) आणि Realme Pad (टॅबलेट) हे दोन्ही डिवाइस कंपनी सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान सादर केले जाऊ शकतात.  

Realme Pad ची डिजाईन  

समोर आलेल्या रेंडर्सनुसार, Realme Pad मध्ये 10.4-इंचाचा मोठा डिस्प्ले असेल. या टॅबमध्ये फ्लॅट कडा दिल्या जाऊ शकतात, त्यामुळे हा एखाद्या स्लॅब सारखा दिसत आहे. रियलमी पॅडच्या मागे एक कॅमेरा सेन्सर मिळेल. बॅक पॅनलवर एका बाजूला रियलमीची ब्रॅंडिंग असेल तर दुसरीकडे एक रेष कॅमेरा मॉड्यूलच्या मधोमध जाताना दिसत आहे. हा टॅब मोठ्या प्रमाणावर 2020 च्या Apple iPad Pro सारखा दिसत आहे. या टॅबलेटचे रेंडर्स Grey-Black रंगात दिसत आहेत.  

Realme Pad च्या फ्रंट पॅनलवर एक सेल्फी कॅमेरा असेल. हे टॅब जाड बेजलसह सादर केला जाऊ शकतो. या टॅबच्या वरच्या बाजूला पावर बटण आणि दोन स्पिकर मिळतील. तसेच तळाला देखील दोन स्पिकर आणि एक USB टाइप-C पोर्ट दिला जाऊ शकतो. व्हॉल्युम रॉकर्स उजवीकडे देण्यात येतील. या टॅबलेटचा अकरा 246.1mm x 155.8mm x 6.8mm असा असेल. कॅमेरा बंपसह हा टॅबलेट 8.4mm जाड असेल.  

Realme Pad चे लीक स्पेसिफिकेशन्स 

Realme Pad टॅबलेट मॉडेल नंबर BLT001 सह एका सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट करण्यात आला होता. या लिस्टिंगमध्ये हा टॅबलेट 7,100mAh च्या बॅटरीसह दिसला होता. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा डिवाइस Silver-Grey कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाईल. लवकरच या डिवाइसबाबत अधिक माहिती समोर येऊ शकते.  

Web Title: Realme pad renders show that the device will feature a built in stylus 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.