रियलमीचा सर्वात पहिला टॅबलेट भारतात येण्यासाठी सज्ज; कंपनीने सांगितली Realme Pad ची लाँच डेट
By सिद्धेश जाधव | Published: September 3, 2021 05:39 PM2021-09-03T17:39:56+5:302021-09-03T17:44:50+5:30
Realme Pad launch: येत्या 9 सप्टेंबरला रियलमी 8 सीरिजमधील दोन स्मार्टफोनसह Realme Pad देखील भारतात दाखल होणार आहे.
रियलमी टॅबलेट सेगमेंटमध्ये उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या 9 सप्टेंबरला रियलमी 8 सीरिजमधील दोन स्मार्टफोनसह Realme Pad देखील भारतात दाखल होणार आहे. आता रियलमीचा आगामी टॅब फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमधून टॅबलेटच्या जाडीची माहिती मिळाली आहे. रियलमी पॅड 6.9mm इतका जाड असेल. याव्यतिरिक्त या लिस्टिंगमधून जास्त माहिती समोर आली नाही.
रियलमीने या टॅबलेटमधील डिस्प्लेवर खूप काम केल्याचे कंपनीने सांगितले आहे. सीएमओ फ्रान्सिस वॉन्ग यांनी सांगितले आहे कि, Realme Pad मध्ये AMOLED डिस्प्ले दिला जाईल. तसेच या टॅबलेटमध्ये फुल स्केल ऑडियो-व्हिज्युअल एक्सपीरियंस मिळेल. तसेच युजर्सने लक्ष केंद्रित करून ई-रीडिंग करता येईल. या टॅबलेटमध्ये मोठी बॅटरी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर करण्यात येईल. कंपनी हा टॅब मिड रेंज सेगमेंटमध्ये सादर करू शकते, त्यामुळे याची किंमत 20 हजार रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.
Realme Pad चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Realme Pad काही दिवसांपूर्वी Geekbench वर मॉडेल नंबर RMP2102 सह दिसला होता. या लिस्टिंगनुसार, या टॅबलेटमध्ये MediaTek Helio G80 चिपसेट मिळेल. तसेच 4GB RAM आणि Android 11 OS वर आधारित Realme UI 2.0 देण्यात येईल. या टॅबमधील अॅमोलेड डिस्प्लेचा आकार 10.4-इंच असेलस्लिम बेजलसह सादर केला जाईल. या टॅबलेटमध्ये स्टायलस पेनचा सपोर्ट आणि स्लॉट देखील मिळेल. तसेच टॅबच्या फ्रंट आणि बॅकवर असलेले दोन्ही कॅमेरे 8 मेगापिक्सलचे असतील.