8360mAh बॅटरी दणकट बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसरसह Realme चा टॅबलेट येणार; लाँच डेट समजली
By सिद्धेश जाधव | Published: May 21, 2022 01:17 PM2022-05-21T13:17:08+5:302022-05-21T13:17:52+5:30
Realme Pad X 5G ची लाँच डेट स्वतः कंपनीनं सांगितली आहे. टॅबलेटमध्ये कंपनी स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 8360mAh ची बॅटरी देऊ शकते.
रियलमीनंटॅबलेट सेगमेंटला जास्त गांभीर्यानं घेण्याचं ठरवलेलं दिसतंय आहे. रियलमी पॅड आणि रियलमी पॅड मिनी नंतर आता कंपनी नव्या 5G टॅबलेटवर काम करत आहे. Realme Pad X कंपनीचा तिसरा टॅबलेट असेल. जो चीनमध्ये 26 मेला लाँच केला जाईल, असं रियलमीनं सांगितलं आहे. रियलमी पॅड एक्स मिड-रेंज सेंगमेंटमध्ये सादर केला जाऊ शकतो.
रियलमीनं आपल्या आगामी टॅबलेटचा एक पोस्टर शेयर करून याच्या डिजाइनची झलक दाखवली आहे. समोर आलेल्या पोस्टरनुसार आगामी रियलमी टॅब स्टायलस सपोर्टसह सादर केला जाईल, या स्टायलसचं नाव Realme Pencil असू शकतं. पोस्टरनुसार हा टॅब नियो कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाईल. मागे सिंगल कॅमेरा सेटअप AI फीचर्ससह मिळेल. टॅबच्या साईड बेजलवर फ्रंट कॅमेरा मिळेल आणि पॅडची जाडी 7.1mm असेल.
रियलमी पॅडचे लीक स्पेसिफिकेशन
आगामी रियलमी पॅड एक्सचे काही स्पेक्स लीक आणि रिपोर्ट्समधून समोर आले आहेत. त्यानुसार पॅडमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 2.5K रिजोल्यूशन असलेला 11 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा डिस्प्ले 11 इंचाचा असेल. कंपनी यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 चिपसेटचा वापर करू शकते सोबत अड्रीनो 650 जीपीयू मिळेल.
पॅड मध्ये कंपनी 8360mAh ची मोठी बॅटरी देऊ शकते. ही बॅटरी फास्ट चार्जिंग सपोर्टसह बाजारात येऊ शकते. JD.com च्या लिस्टिंगनुसार या टॅबचे दोन व्हेरिएंट आता रिजर्व करता येत आहेत. ज्यात 4GB/64GB आणि 6GB/128GB मॉडेल्सचा समावेश आहे. हा 5G टॅबलेट चेसबोर्ड ग्रीन, स्टार ग्रे आणि सी सॉल्ट ब्लू कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल.