जबरदस्त फीचर्ससह शाओमीला टक्कर देण्यासाठी येतोय Realme Q3t; वेबसाईटवरून झाला स्पेसिफिकेशन्सचा खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 05:31 PM2021-10-29T17:31:47+5:302021-10-29T17:32:28+5:30

Upcoming Realme Phone Realme Q3t Price And Datails: Realme Q3t स्मार्टफोनची माहिती database of China Telecom च्या लिस्टिंगमधून मिळाली आहे. या लिस्टिंगमध्ये हा फोन RMX3642 मॉडेल नंबरसह दिसला होता.

Realme Q3t to Launch soon specs price leak  | जबरदस्त फीचर्ससह शाओमीला टक्कर देण्यासाठी येतोय Realme Q3t; वेबसाईटवरून झाला स्पेसिफिकेशन्सचा खुलासा 

हा फोटो Realme Q3s चा आहे.

googlenewsNext

रियलमीने आपला पोर्टफोलियो वाढवण्याचा सपाट सुरूच ठेवला आहे. कंपनी लागोपाठ स्मार्टफोन्स सादर करत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीच्या ‘क्यू सीरीज’ मध्ये आपला Realme Q3s स्मार्टफोन सादर करण्यात आला होता. हा मिडरेंज स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेटसह सादर करण्यात आला होता. आता कंपनी या सीरीजमध्ये अजून एक नवीन फोन सादर करणार असल्याची बातमी आली आहे. हा डिवाइस Realme Q3t नावाने बाजारात उतरेल.  

आगामी Realme Q3t स्मार्टफोनची माहिती database of China Telecom च्या लिस्टिंगमधून मिळाली आहे. या लिस्टिंगमध्ये हा फोन RMX3642 मॉडेल नंबरसह दिसला होता. या वेबसाईटवरून फोनच्या फ्रंट आणि बॅक पॅनलचा फोटो देखील मिळाली आहे. त्यानुसार रियलमी क्यू3टी स्मार्टफोनच्या फ्रंट पॅनलवर पंच होल देण्यात येईल. तर बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. तसेच साईड पॅनलवरील फिंगरप्रिंट सेन्सर देखील या फोटोमध्ये दिसत आहे.  

Realme Q3t ची किंमत  

Realme Q3s ची किंमत चीनमध्ये 1,599 युआन म्हणजे जवळपास 18,700 रुपयांपासून सुरु झाली आहे. त्यामुळे आगामी Realme Q3t देखील याच रेंजमध्ये सादर केला जाऊ शकतो. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार हा फोन 25000 रुपयांच्या आत लाँच केला जाऊ शकतो.  

काही दिवसांपूर्वी आलेला Realme Q3s  

Realme Q3s मध्ये 6.6-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एलसीडी डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीने यात क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 778G चिपसेटचा वापर केला आहे. या फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. सोबत 5GB एक्सटेंडेड रॅम मिळतो. हा फोन Android 11 सह RealmeUI 2.0 वर चालतो.  

Realme Q3s मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 48MP चा प्रायमरी सेन्सर, एक ब्लॅक अँड व्हाइट पोर्ट्रेट कॅमेरा आणि एक मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनमध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत. स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे जी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

Web Title: Realme Q3t to Launch soon specs price leak 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.