जबराट Realme Q3t आला बाजारात; फोनमध्ये 13GB RAM आणि 48MP कॅमेरा, जाणून घ्या किंमत
By सिद्धेश जाधव | Published: November 10, 2021 12:58 PM2021-11-10T12:58:04+5:302021-11-10T12:58:19+5:30
Realme Q3t Price and Launch: Realme Q3t फोन एक Cloud Mobile Phone आहे, म्हणजे या फोनमधील स्टोरेज न वापरता यात Cloud Apps, Cloud Games, Cloud Videos, Cloud VR इत्यादींचा वापर करता येतो.
गेल्या महिन्यात रियलमी आपल्या Q-सीरीजचा विस्तार करणार असल्याची बातमी आली होती. त्यानुसार कंपनीने आता Realme Q3t चीनमध्ये सादर केला आहे. या नवीन फोन एक Cloud Mobile Phone आहे, म्हणजे या फोनमधील स्टोरेज न वापरता यात Cloud Apps, Cloud Games, Cloud Videos, Cloud VR इत्यादींचा वापर करता येतो.
Realme Q3t चे स्पेसिफिकेशन्स
Realme Q3t मध्ये कंपनीने 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मेन सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळेल. हा एक 5G Phone आहे जो वाय-फाय 802.11ac, ब्लूटूथ 5.1, GPS, USB-C पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅकला सपोर्ट करतो.
Realme Q3t मध्ये 6.6-इंचाचा फुलएचडी+ IPS LCD पॅनल देण्यात आला आहे. फोनमध्ये Snapdragon 778G प्रोसेसर आहे. त्याचबरोबर 8GB RAM आणि 5GB व्हर्च्युअल रॅम देण्यात आला आहे. या डिवाइसची 256GB मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. हा डिवाइस Realme UI 2.0 सह Android 11 वर चालतो. पॉवर बॅकअपसाठी Q3t मध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळते, जी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Realme Q3t ची किंमत
रियलमी Q3t चीनमध्ये Nebula आणि Night Sky Blue अशा दोन रंगात सादर केला आहे. हा फोन 2099 युआन (सुमरे 24,337 रुपये) मध्ये विकत घेता येईल. जागतिक बाजारातील लाँचची माहिती मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.