80W फास्ट चार्जिंगसह Realme Q5 Pro ची एंट्री; पावरफुल फोनमध्ये 64MP कॅमेरा आणि 13GB RAM
By सिद्धेश जाधव | Published: April 20, 2022 07:23 PM2022-04-20T19:23:53+5:302022-04-20T19:24:01+5:30
64MP Camera, 80W fast charging आणि Snapdragon 870 चिपसेट असलेला Realme Q5 Pro चीनमध्ये आला आहे. .
Realme नं काही दिवसांपूर्वी आपल्या क्यू सीरिजचा विस्तार करत एक स्मार्टफोन सादर केला होता. आज कंपनीनं दोन नव्या हॅंडसेट्सची भर या सीरिजमध्ये टाकली आहे. चीनमध्ये Realme Q5 आणि Realme Q5 Pro हे दोन डिवाइस ग्राहकांच्या भेटीला आले आहेत. यातील 64MP Camera, 80W fast charging आणि Snapdragon 870 चिपसेट असलेल्या Realme Q5 Pro ची माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
Realme Q5 Pro चे स्पेसिफिकेशन्स
रियलमी क्यू5 प्रो स्मार्टफोनमध्ये 6.62 इंचाचा फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1000हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 12 ओएस बेस्ड रियलमी युआय 3.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 5जी चिपसेट दिला आहे. . ग्राफिक्ससाठी एड्रेनो 650 जीपीयू मिळतो. फोन 5 जीबी व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो त्यामुळे एकूण 13 जीबी रॅमची ताकद मिळवता येते.
फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो. सोबत 8 मेगापिक्सलची सुपर वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. तर 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंटची सुरक्षा देण्यात आली आहे. रियलमी क्यू5 प्रो मधील 5,000एमएएच बॅटरी 80 वॉट फास्ट चार्जिंगलस सपोर्ट करते.
Realme Q5 Pro ची किंमत
रियलमी क्यू5 प्रो स्मार्टफोनच्या 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोेरेज मॉडेलची किंमत 1799 युआन (सुमारे 21,500 रुपये) ठेवण्यात आली आहे. 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजसाठी 1999 युआन (सुमारे 23,800 रुपये) तर 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजसाठी 2199 युआन (जवळपास 26,200 रुपये) द्यावे लागतील. फोनच्या भारतीय लाँचची माहिती मात्र मिळाली नाही.