बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी 11GB रॅमसह Realme Q5i ची एंट्री; दिवसभर पुरेल 5000mAh ची बॅटरी
By सिद्धेश जाधव | Published: April 18, 2022 07:16 PM2022-04-18T19:16:30+5:302022-04-18T19:17:33+5:30
Realme Q5i स्मार्टफोनमध्ये बजेटमध्ये 11GB RAM, 5000mAh बॅटरी, 90Hz रिफ्रेश रेट आणि 33 वॉट फास्ट चार्जिंग फिचर देतो.
गेल्या आठवड्यात बातमी आली होती की रियलमी आपल्या क्यू सीरिजमध्ये नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. त्यानुसार आज कंपनी चीनमध्ये Realme Q5i स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनमध्ये 11GB RAM, 90Hz रिफ्रेश रेट, 5000mAh बॅटरी, मीडियाटेक डिमेन्सिटी 810 चिपसेट आणि 33W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. किंमत देखील कंपनीनं बजेटमध्ये ठेवली आहे.
Realme Q5i चे स्पेसिफिकेशन्स
Realme Q5i मध्ये 6.58 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅंप्लिंग रेटला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 12 वर आधारित Realme UI 3.0 वर चालतो. यात प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकच्या डिमेन्सिटी 810 5G चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. यात 6 जीबी पर्यंतचा LPDDRx रॅम देण्यात आला आहे. ज्यात 5GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम देखील अॅड करता येतो. सोबत 128 जीबी ची UFS 2.2 स्टोरेज मिळते.
या फोनच्या मागे फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि एक 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. कंपनीनं फ्रंटला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. Realme Q5i मध्ये पावर बॅकअपसती 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 33 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Realme Q5i ची किंमत
Realme Q5i स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट चीनमध्ये सादर करण्यात आले आहेत. या फोनच्या 4 जीबी रॅम आणि 128 जीबी मॉडेलची किंमत 1199 युआन (सुमारे 14,300 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर 6 जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज असलेल्या मोठ्या मॉडेलसाठी 1299 युआन (सुमारे 15,550 रुपये) मोजावे लागतील. हा फोन भारतात मात्र रीब्रँड करून सादर केला जाऊ शकतो.