रेडमीनंतर ‘या’ कंपनीनं सादर केले दोन स्वस्त Smart TV; मालिकांसह नेटफ्लिक्स देखील पाहा  

By सिद्धेश जाधव | Published: April 30, 2022 01:12 PM2022-04-30T13:12:51+5:302022-04-30T13:13:01+5:30

Realme नं भारतात दोन नवीन Android Smart TV सादर केले आहेत. Realme Smart TV X FHD सीरिजचे 40 इंच आणि 43 इंचाचे मॉडेल देशात आले आहेत.  

Realme Smart TV X FHD Launched In India With Android 11   | रेडमीनंतर ‘या’ कंपनीनं सादर केले दोन स्वस्त Smart TV; मालिकांसह नेटफ्लिक्स देखील पाहा  

रेडमीनंतर ‘या’ कंपनीनं सादर केले दोन स्वस्त Smart TV; मालिकांसह नेटफ्लिक्स देखील पाहा  

googlenewsNext

Relame Smart TV X Full HD सिरीज भारतात लाँच झाली आहे. कंपनीनं Realm GT Neo3 आणि अन्य 3 प्रोडक्ट्स देखील देशात एकाच इव्हेंटमधून सादर केले आहेत. या नव्या स्मार्ट टीव्ही सीरीजमध्ये 40 इंच आणि 43 इंचाचे दोन मॉडेल आहेत. जे Full HD रिजोल्यूशन, HDR10, Android 11, Dolby Audio आणि Full Vision बेजल लेस डिस्प्लेसह बाजारात आले आहेत.  

Realme Smart TV X Full HD चे स्पेसिफिकेशन्स 

या टीव्हीमध्ये Full Vison सपोर्ट असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन Full HD आहे. चांगल्या पिक्चर क्वॉलिटीसाठी क्रोमा बूस्ट पिक्चर इंजिनसह HDR10 आणि HLC सारखे फीचर्स मिळतात. ऑडियोसाठी यात 24W चे क्वॉड स्टीरियो स्पिकर्स देण्यात आले आहेत. हे स्पिकर्स Dolby Audio ला सपोर्ट करतात.  

Realme Smart TV X FHD मध्ये MediaTek Quad Core प्रोसेसर आहे. ग्राफिक्ससाठी Mali G32 MP2 GPU देण्यात आला आहे. तसेच, ARM Cortec A55 CPU देखील आहे. कंपनीनं या टीव्हीमध्ये 1GB RAM आणि 8GB स्टोरेज दिली आहे. हा स्मार्ट टीव्ही Android TV 11 ऑपरेटिंग सिस्टमवर वर चालतो. त्यामुळे Google Assistant आणि गुगल क्रोमकास्ट बिल्ट-इन आहे. तसेच यात Netflix, Prime Video आणि YouTube सारखे OTT अ‍ॅप्स प्री-इंस्टॉल्ड मिळतात.  

कनेक्टिव्हिटीसाठी Realme TV X FHD मध्ये ब्लूटूथ 5.0 आणि ड्युअल बँड Wi-Fi सपोर्ट आहे. तसेच HDMI ARC पोर्ट, दोन HDMI पोर्ट, दोन USB पोर्ट, एक 3.5mm ऑडियो जॅक, LAN केबल कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल ऑडियो आउटपुट देखील आहे.  

Realme Smart TV X Full HD ची किंमत 

40 इंचाच्या मॉडेलची किंमत 20,999 रुपये आहे. तर 43 इंचाचा व्हेरिएंट 22,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. यांचे सेल मात्र वेगवेगळ्या तारखांना आयोजित करण्यात आले आहेत रियलमी स्मार्ट टीव्हीचा 40 इंचाचा मॉडेल 4 मेला पहिल्यांदा विक्रीसाठी येईल. तर दुसरा मॉडेल 5 मेपासून विकत घेता येईल. 

Web Title: Realme Smart TV X FHD Launched In India With Android 11  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.