घरबसल्या थिएटरची मजा! Realme सादर करणार 43-इंचाचा दमदार Smart TV
By सिद्धेश जाधव | Published: April 22, 2022 07:25 PM2022-04-22T19:25:09+5:302022-04-22T19:25:19+5:30
Realme भारतात दोन दमदार Smart TV लाँच करणार आहे. याची माहिती कंपनीच्या वेबसाईटवरून मिळाली आहे.
Realme नं आज भारतात आपला किफायतशीर फ्लॅगशिप स्मार्टफोन Realme GT 2 5G सादर केला आहे. परंतु यावरच कंपनी थांबणार नाही येत्या 29 एप्रिलला एका इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं आहे. या इव्हेंटमधून कंपनी अनेक प्रोडक्ट्स सादर करणार आहे. ज्यात फ्लॅगशिप ग्रेड Realme GT Neo 3 चा समावेश असेल. त्याचबरोबर Realme Smart TV X Full HD देखील भारतीयांच्या भेटीला येणार आहे.
Realme Smart TV X Full HD
Realme च्या 29 एप्रिलच्या इव्हेंटमधून नवीन स्मार्ट टीव्ही येणार असल्याची माहिती खुद्द कंपनीनं आपल्या वेबसाईटवरून दिली आहे. या टीव्हीचं नाव Realme Smart TV X Full HD असेल, वेबसाईटवरून काही फीचर्सची माहिती देखील समोर आली आहे. त्यानुसार या टीव्हीचे FHD रिजॉल्यूशन असलेले दोन मॉडेल 40-इंच व 43-इंच देशात येतील. हे मॉडेल्स बेझल लेस डिजाईनसह सादर केले जातील.
हा टीव्ही HDR10 आणि HLG HDR फॉर्मेटला सपोर्ट करेल. यात रियलमीचा ‘क्रोमा बूस्ट पिक्चर इंजिन’ डिस्प्ले प्रोफाईल देण्यात येईल. प्रोसेसिंगसाठी या या टीव्हीमध्ये Mediatek SoC चा वापर करण्यात येईल. ज्यात क्वॉड-कोर एआरएम कोर्टेक्स-ए55 सीपीयू आणि एआरएम माली-जी31 जीपीयू असेल. सोबत 1GB रॅम आणि 8GB इंटरनल स्टोरेज मिळेल. यात डॉल्बी ऑडियो सपोर्टसह 24W क्वॉड-स्पिकर सिस्टम मिळेल.