भन्नाट छुप्या सेल्फी कॅमेऱ्यासह येतोय Realme चा फोन; ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह येणार बाजारात
By सिद्धेश जाधव | Published: November 8, 2021 01:20 PM2021-11-08T13:20:02+5:302021-11-08T13:20:11+5:30
Realme Under Display Camera Phone: रियलमी लवकरच अंडर डिस्प्ले कॅमेरा असलेला फोन लाँच करू शकते. आता एक पेटंट लीक झाले आहे त्यातून या स्मार्टफोनची माहिती समोर आली आहे.
रियलमीची ओळख कमी किंमतीत चांगले फीचर्स आणि लूक असणारे स्मार्टफोन सादर करणारी कंपनी अशी आहे. परंतु आता कंपनी आपली ओळख बदलू पाहत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीच्या आगामी अल्ट्रा प्रीमियम स्मार्टफोनची माहिती समोर आली होती. आता realme एका अंडर डिस्प्ले कॅमेरा असेलल्या फोनवर काम करत आहे, अशी बातमी आली आहे.
रियलमी लवकरच अंडर डिस्प्ले कॅमेरा असलेला फोन लाँच करू शकते. आता एक पेटंट लीक झाले आहे त्यातून या स्मार्टफोनची माहिती समोर आली आहे. ZTE ने सर्वप्रथम Axon 20 5G च्या माध्यमातून अंडर डिस्प्ले कॅमेरा असलेल्या व्यवसायिक फोनची निर्मिती केली होती. यावर्षी आलेल्या Samsung Galaxy Z Fold 3 आणि Mix 4 मध्ये देखील अंडर डिस्प्ले कॅमेरा टेक्नॉलॉजी देण्यात आला आहे.
आता Realme या सेगमेंटमध्ये उतरणार असल्याचे दिसत आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी या मोबाईलचा एक पेटंट फाईल केला आहे ज्यात डिस्प्लेवर कोणतीही नॉच किंवा कटआउट दिसत नाही. त्यामुळे हा रियलमीचा छुपा अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेरा असलेला पहिला फोन असेल, अशी चर्चा आहे.
Realme Under Display Camera Phone
Realme अंडर डिस्प्ले कॅमेरा फोनची डिजाइन पेटंटमधून समजली आहे. त्यानुसार बॅक पॅनलवर आयताकृती कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्यात 3 कॅमेरे सेन्सर देण्यात आले आहेत. त्याचबरोबर एक एलईडी फ्लॅश देखील दिसत आहे. फ्रंटला डिस्प्लेवर कोणतीही कॅमेरा कटआउट दिसत नाही. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला पातळ एक ईयर पीस दिसत आहे. डावीकडे पॉवर बटन आहे तर उजवीकडे वॉल्यूम बटन देण्यात आले आहेत. तळाला सिम कार्ड स्लॉट आणि यूएसबी टाइप सी स्लॉट दिसत आहे. परंतु हा फोन 3.5 एमएम ऑडियो जॅकसह येणार नाही.