23 जुलैला भारतात येणार Realme Watch 2 Pro; असे असतील स्पेसिफिकेशन्स
By सिद्धेश जाधव | Published: July 15, 2021 03:31 PM2021-07-15T15:31:15+5:302021-07-15T15:34:39+5:30
Realme Watch 2 Pro अॅमेझॉनच्या माध्यमातून भारतात खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. 23 जुलैला दुपारी 12.30 वाजता लाँच हा स्मार्टवॉच लाँच केला जाईल.
Realme Watch 2 Pro स्मार्टवॉच लवकरच भारतात सादर केला जाणार आहे. हा स्मार्टवॉच 23 जुलै रोजी Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अमेझॉनवर रियलमी वॉच 2 प्रोचे प्रॉडक्ट पेज लाईव्ह करण्यात आले आहे. या प्रॉडक्ट पेजनुसार या स्मार्टवॉचमध्ये 1.75 इंचाचा कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. यातील 390mAh ची बॅटरी सिंगल चार्जवर 24 तास हार्ट रेट मॉनिटरिंगसह 14 दिवसांचा बॅकअप देऊ शकते.
Realme Watch 2 Pro यापूर्वी मलेशियात लाँच झाला आहे. तिथे याची किंमत MYR 299 (सुमारे 5,400 रुपये) आहे. हा स्मार्टवॉच मेटॅलिक सिल्वर आणि स्पेस ग्रे कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. आशा आहे कि भारतात देखील या रियलमी स्मार्टवॉचची किंमत हीच असेल.
Realme Watch 2 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Realme Watch 2 Pro मध्ये 1.75 इंचाचा आयताकृती टच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 320x320 पिक्सल रिजोल्यूशन आणि 600 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. या रियलमी वॉचमध्ये 390mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी एकदा फुल चार्ज केल्यावर 24 तास हार्ट रेट मॉनिटरिंगसह 14 दिवस वापरता येतो.
यात इन-बिल्ट हार्ट रेट सेन्सर आणि 90 स्पोर्ट्स मोड सह थ्री-अॅक्सिस एक्सेलेरोमीटर आहे. तसेच हा स्मार्टवॉच IP68 डस्ट अँड वॉटर रसिस्टेंट आहे. Realme Watch 2 Pro मध्ये हार्ट रेट, एक्सरसाइज हार्ट रेट, ब्लड ऑक्सिजन लेव्हल, स्लिप डिटेक्शन इत्यादी फीचर्स देण्यात आला आहे. यात बास्केटबॉल, आउटडोर रनिंग, योगा, क्रिकेट, फुटबॉल, स्ट्रेंथ ट्रेनिंग असे अनेक स्पोर्ट्स मोड मिळतात.