7 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह Realme Watch T1 लाँच; मिळतोय हार्ट रेट मॉनिटर आणि SpO2 सेन्सर
By सिद्धेश जाधव | Published: October 19, 2021 07:42 PM2021-10-19T19:42:27+5:302021-10-19T19:43:45+5:30
Budget Smartwach Realme Watch T1 Price: कंपनीने Realme Watch T1 स्मार्टवॉच चीनमध्ये सादर केला आहे. ज्यात 110 स्पोर्ट्स मोड, हार्ट रेट मॉनिटर आणि ऑक्सिजन सॅचुरेशन (SpO2) मॉनिटर देण्यात आला आहे.
रियलमीने चीनमध्ये Realme Watch T1 स्मार्टवॉच सादर केला आहे. त्याचबरोबर कंपनीने Realme GT Neo 2T आणि Realme Q3s असे दोन स्मार्टफोन्स देखील सादर केले आहेत. या नवीन स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट आणि ऑक्सिजन सॅचुरेशन (SpO2) असे हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच ब्लूटूथ कॉलिंग, नवीन वॉच फेस आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळतो.
Realme Watch T1 ची किंमत
Realme Watch T1 ची किंमत 699 चायनीज युआन ठेवण्यात आली आहे. ही किंमत 8,200 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. कंपनीने रियलमी वॉच टी1 ब्लॅक, मिंट आणि ऑलिव ग्रीन कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे. भारतसह इतर ठिकणी हा स्मार्टवॉच कधी उपलब्ध होईल हे अजून समजले नाही.
Realme Watch T1 चे स्पेसिफिकेशन्स
रियलमी वॉच टी1 मध्ये 1.3 इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा वर्तुळाकार वॉच स्टेनलेस स्टिल फ्रेम आणि कोर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टवॉच ब्लूटूथ कॉलिंगला सपोर्ट करतो. म्हणजे युजर्स थेट या स्मार्टवॉचवरून व्हॉइस कॉल रिसिव्ह करू शकतात. यातील 4 जीबी स्टोरेजचा वापर म्यूजिक सेव्ह करण्यासाठी केला जाऊ शकतो.
Realme Watch T1 मध्ये अॅक्सेलेरोमीटर, अँबियंट लाईट सेन्सर, जायरोस्कोप, जियोमॅग्नेटिक सेन्सरसह हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सीजन असे हेल्थ सेन्सर मिळतात. जे रियल-टाइम हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 मॉनिटरिंग आणि स्लीप अॅनालिसिस करण्यास मदत करतात. यात बॅडमिंटन, इलिप्टिकल, हायकिंग आणि वॉकिंगसह 110 स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत.
हा स्मार्टवॉच 5ATM (50 मीटर) वॉटरप्रूफ देखील आहे. त्यामुळे पाण्यात देखील याचा वापर करता येईल. रियलमी वॉट टी1 मध्ये फास्ट मॅग्नेटिक चार्जिंग सपोर्ट मिळतो. यातील 228mAh ची बॅटरी सिंगल चार्जवर 7 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे.