Budget Smartwach: हार्ट रेट मॉनिटर आणि SpO2 सेन्सर असलेला Realme Watch T1 भारतीय लाँचच्या मार्गावर; जाणून घ्या
By सिद्धेश जाधव | Published: December 3, 2021 03:06 PM2021-12-03T15:06:43+5:302021-12-03T15:07:32+5:30
Budget Smartwach Realme Watch T1: Realme Watch T1 चीनमध्ये Heart Rate Monitor, SpO2 Sensor आणि स्लीप अॅनालिसीस अशा फीचर्ससह सादर करण्यात आला आहे.
Budget Smartwach: Realme नं ऑक्टोबरमध्ये चिनी बाजारात आपला Realme Watch T1 नावाचा Smartwatch सादर केला होता. या वॉचमध्ये Heart Rate Monitor, SpO2 Sensor आणि स्लीप अॅनालिसीस असे फीचर्स देण्यात आले होते. आता कंपनी हा स्मार्टवॉच भारतात सादर करू शकते. हा रियलमी स्मार्टवॉच कथितरित्या भारतीय स्टँडर्ड ब्यूरो (BIS) वेबसाईटवर दिसला आहे. Realme Watch T1 चा मॉडेल नंबर RMW2103 BIS लिस्टिंगमध्ये दिसला आहे, अशी माहिती टिपस्टर मुकुल शर्माने दिली आहे. त्यामुळे हा वॉचचा भारतीय लाँच जास्त दूर नसल्याचा अंदाज लावण्यात आला आहे.
Realme Watch T1 चे स्पेसिफिकेशन्स
रियलमी वॉच टी1 मध्ये 1.3 इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा वर्तुळाकार वॉच स्टेनलेस स्टिल फ्रेम आणि कोर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टवॉच ब्लूटूथ कॉलिंगला सपोर्ट करतो. म्हणजे युजर्स थेट या स्मार्टवॉचवरून व्हॉइस कॉल रिसिव्ह करू शकतात. यातील 4 जीबी स्टोरेजचा वापर म्यूजिक सेव्ह करण्यासाठी केला जाऊ शकतो.
Realme Watch T1 मध्ये अॅक्सेलेरोमीटर, अँबियंट लाईट सेन्सर, जायरोस्कोप, जियोमॅग्नेटिक सेन्सरसह हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सीजन असे हेल्थ सेन्सर मिळतात. जे रियल-टाइम हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 मॉनिटरिंग आणि स्लीप अॅनालिसिस करण्यास मदत करतात. यात बॅडमिंटन, इलिप्टिकल, हायकिंग आणि वॉकिंगसह 110 स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत.
हा स्मार्टवॉच 5ATM (50 मीटर) वॉटरप्रूफ देखील आहे. त्यामुळे पाण्यात देखील याचा वापर करता येईल. रियलमी वॉट टी1 मध्ये फास्ट मॅग्नेटिक चार्जिंग सपोर्ट मिळतो. यातील 228mAh ची बॅटरी सिंगल चार्जवर 7 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे.
Realme Watch T1 ची किंमत
Realme Watch T1 ची किंमत 699 चायनीज युआन ठेवण्यात आली आहे. ही किंमत 8,200 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. कंपनीने रियलमी वॉच टी1 ब्लॅक, मिंट आणि ऑलिव ग्रीन कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे.