रियलमीने बंद केली भारतातील ही फ्लॅगशिप सीरिज; नवीन स्मार्टफोन होणार नाहीत लाँच
By सिद्धेश जाधव | Published: August 16, 2021 03:32 PM2021-08-16T15:32:47+5:302021-08-16T15:44:01+5:30
Realme X series discontinue: कंपनी आता Realme X सीरिज बंद करणार आहे आणि या सीरीज अंतगर्त नवीन मोबाईल फोन लाँच केले जाणार नाहीत.
18 ऑगस्टला भारतात रियलमीची फ्लॅगशिप सीरिज लाँच होणार आहे. या सीरिज अंतर्गत Realme GT आणि Realme GT Master Edition हे दोन स्मार्टफोन सादर केले जातील. जागतिक बाजारात आधीपासून उपलब्ध असलेले हे स्मार्टफोन लवकरच भारतात खरेदीसाठी उपलब्ध होतील. या नवीन ‘जीटी’ सीरिजबाबत एक बातमी आता समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी आता Realme X सीरिज बंद करणार आहे आणि या सीरीज अंतगर्त नवीन मोबाईल फोन लाँच केले जाणार नाहीत.
टेक रडारने आपल्या रिपोर्ट्समध्ये Realme ‘X’ series भारतात बंद होणार असल्याचा दावा केला आहे. ही माहिती रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी दिली असल्याची माहिती टेक रडारने म्हटले आहे. माधव सेठ यांनी एका मुलाखतीती सांगितले आहे कि ही सीरीज बंद केली जात आहे आणि या सीरिजची जागा GT सीरीज घेणार आहे. म्हणजे आता रियलमी ‘एक्स’ सीरीज अंतगर्त नवीन स्मार्टफोन लाँच होणार नाहीत. Realme X7 Max 5G हा एक्स सीरिजमधील भारतात लाँच होणारा शेवटचा स्मार्टफोन असेल.
हे देखील वाचा: रियलमी लाँच करणार जगातील पहिला MediaTek Dimensity 810 चिपसेट असलेला 5G फोन; कंपनीने केली घोषणा
Realme GT 5G चे स्पेसिफिकेशन
Realme GT 5G मध्ये 6.43-इंचाचा FHD+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटवर चालतो. हा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888 5G एसओसी आणि Adreno 660 GPU देण्यात आला आहे.
हे देखील वाचा: जगातील सर्वात किफायतशीर 4G फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; जाणून घ्या JioPhone Next ची माहिती
कॅमेऱ्यासाठी Realme GT 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सलच्या मुख्य सेन्सरसह 8 मेगापिक्सलची वाइड-अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. फोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलच्या सेल्फी शुटर देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. तसेच, फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 65W फास्ट चार्जिंगसह 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.