Realme X7 आणि Realme X7 Pro 5G भारतात होणार लाँच; 'हे' असणार खास फीचर्स

By जयदीप दाभोळकर | Published: January 27, 2021 03:18 PM2021-01-27T15:18:33+5:302021-01-27T15:21:53+5:30

पाहा काय आहेत तगडे स्पेसिफिकेशन्स

Realme X7 and Realme X7 Pro 5G to be launched in India on 4th of february know specifications | Realme X7 आणि Realme X7 Pro 5G भारतात होणार लाँच; 'हे' असणार खास फीचर्स

Realme X7 आणि Realme X7 Pro 5G भारतात होणार लाँच; 'हे' असणार खास फीचर्स

Next
ठळक मुद्दे४ फेब्रुवारी रोजी स्मार्टफोन्स होणार भारतात लाँच५जी आणि अन्य जबरदस्त फीचर्ससह येणार हे फोन

स्मार्टफोन उत्पादन करणारी कंपनी रिअलमी भारतात आपल्या नेक्स्ट सीरिजचे स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी या फोनसंबंधी अनेक बाबी लीक झाल्या होत्या. तर काही टीझरही समोर आले होते. परंतु आता कंपनीनं Realme X7 आणि Realme X7 Pro 5G हे स्मार्टफोन भारतात लाँच करण्याची तारीख निश्चित केली आहे. सध्या कंपनीनं भारतात हे फोन केव्हा लाँच केले जातील याची माहिती दिली आहे. परंतु याचा सेल केव्हापासून सुरू होईल याबाबत मात्र पुढील महिन्यातच माहिती देण्यात येणार आहे. 

मीडिया इनवाईट व्यतिरिक्त रियलमी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव सेठ यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून Realme X7 आणि Realme X7 Pro 5G हे ४ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता भारतात लाँच केले जाणार असल्याची माहिती दिली.

Realme X7 आणि Realme X7 Pro 5G  या दोन्ही स्मार्टफोन्ससाठई कंपनीनं आपल्या वेबसाईटवर निरनिराळे पेज तयार करण्यात आले आहेत. तसंच या फोनचे काही महत्त्वाचे स्पेसिफिकेशन्सही समोर आले आहेत. Realme 7 5G मध्ये डायमेंसिटी 800U 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर 7nm प्रोरेसरवर बेस्ड आहेत. याव्यतिरिक्त या फोनचं वजन १७६ ग्राम असून यात १२० हर्ट्झचा ६.५ इंचाचा सुपर अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी या स्मार्टफोनमध्ये Mali G57 हा जीपीयू वापरण्यात आला आहे. 

बॅटरी क्षमतेबाबत सांगायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसंच हा फोन ३० वॉट सुपरडार्ट चार्ज सपोर्ट करेल. दरम्यान, हा फोन ६५ मिनिटांमध्ये फुल चार्ज होणार असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. याव्यतिरिक्त या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून या ४८ मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा सेन्सर, याव्यतिरिक्त ८ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड अँगल आणि २ मेगापिक्सेलचा मायक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. 

Realme X7 Pro 5G स्पेसिफिकेशन्स

Realme X7 Pro 5G या स्मार्टफोनमध्ये ६,४ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच यात 8nm बेस्ड क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G हा गेमिंग प्रोसेसर आहे. याव्यतिरिक्त या स्मार्टफोनमध्ये ३२ मेगापिक्सेलचा इनडिस्प्ले सेल्फी कॅमेरा देण्यात आला असून मागील बाजूला सोनी ६४ मेगापिक्सेलसह क्वाड कॅमेरा सेटअपही देण्यात आलं आहे. तसंच हा मोबाईल 65W सुपर डार्ट चार्जिंगही सपोर्ट करणार असून हा मोबाईल ३४ मिनिटांत पूर्ण चार्ज होत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. 
 

Web Title: Realme X7 and Realme X7 Pro 5G to be launched in India on 4th of february know specifications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.