Realme चा फोन घेणं पडलं महागात; पुन्हा एकदा Realme XT मध्ये लागली आग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 12:02 PM2021-12-30T12:02:03+5:302021-12-30T12:03:51+5:30
Realme XT Blast: Realme XT फोनचा वापर करताना त्यात स्फोट झाला आहे. एका ट्विटर युजरनं व्हिडीओ पोस्ट करून याची माहिती दिली आहे.
Realme XT Blast: स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईल इतका आवश्यक बनला आहे कि सतत आपण आपल्या जवळ बाळगतो. त्यामुळे फोनमध्ये आग लागल्याची किंवा स्फोट झाल्याची बातमी आली कि धक्का बसतो. अशा घटना फक्त ग्राहकांना घाबरवत नाहीत तर कंपनीच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करतात. आता Realme XT फोनचा वापर करताना त्यात स्फोट झाल्याची बातमी आली आहे.
विशेष म्हणजे जून 2020 मध्ये देखील याच मॉडेलच्या स्फोटाची घटना घडली होती. यावेळी ट्विटर युजर संदीप कुंडू यांनी रियलमी फोनमध्ये आग लागल्याची माहिती ट्विट केली आहे. संदीप यांनी आपल्या मित्राच्या Realme XT चे फोटोज पोस्ट केले आहेत. फोटोजमध्ये स्मार्टफोनची स्क्रीन पूर्णपणे जळाल्याचे दिसत आहे. तसेच कॅमेरा मॉड्यूल देखील या आगीत वाचला नाही. संदीप कुंडू यांनी या स्फोटाचा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये फोनमधून धूर येत असल्याचं दिसत आहे. सुदैवाने, या स्फोटात कोणीही जखमी झालं नाही.
My friend's phone Realme XT blast in the evening today....@MadhavSheth1 please do something 🙏 pic.twitter.com/CrCnaOKnIK
— Sandip Kundu (@SandipK75709658) December 28, 2021
Realme नं या घटनेवर अजूनही कोणतंही विधान केलेलं नाही. परंतु कंपनीच्या सोशल मीडिया हॅन्डलवरून युजरला मदत करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. हा स्फोट का झाला याचं कारण मात्र समजू शकलं नाही. परंतु याआधीच रियलमीचा इतिहास पाहता ‘बाह्य घटकांमुळे’ ही लागल्याचं कंपनी सांगू शकते.
हे देखील वाचा:
फक्त 7,499 रुपयांमध्ये आला 5000mAh Battery असलेला शानदार स्मार्टफोन; Redmi ला टाकणार मागे?
Jio युजर्सनी इकडे लक्ष द्या! या 7 चुका तुम्हाला करू शकतात 'कंगाल', आताही वेळ आहे