Realme चा स्वस्त आणि पहिला लॅपटॉप बाजारात येणार?; किंमत ५० हजारांपेक्षाही कमी असण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 17:03 IST2021-05-05T16:58:48+5:302021-05-05T17:03:04+5:30
Realme : कंपनीचा हा पहिलाच लॅपटॉप असणार. शाओमीच्या मी नोटबूकला याची टक्कर मिळण्याची शक्यता.

Realme चा स्वस्त आणि पहिला लॅपटॉप बाजारात येणार?; किंमत ५० हजारांपेक्षाही कमी असण्याची शक्यता
स्मार्टफोन मार्केटमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर, Realme ही कंपनी लॅपटॉप सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत आहे. कंपनी आपल्या फोरमवर युझर्सना लॅपटॉपविषयी अनेक प्रश्न विचारत आहे. तसंच येत्या दोन तीन महिन्यांमध्ये लॅपटॉप विकत घेण्याचा विचार सुरू आहे का अशी विचारणाही त्यांना केली जात आहे. कंपनीच्या या गोष्टींवरून असं दिसतं की Realme आपला पहिला लॅपटॉप 2021 च्या तिसर्या तिमाहीत लॉन्च करण्याची तयारी करत आहे.
या प्रश्नांसोबतच कंपनीनं किंमतीबाबतही काही प्रश्न विचारले आहे. जर कंपनीनं लॅपटॉप लाँच केला तर किती किंमतीत ते विकत घेण्यासाठी तयार आहेत. तसंच यासाठी प्राईज रेंज 30000 ते 50000 इतकी ठरवण्यात आली आहे. यावरून कंपनी एन्ट्री लेव्हलचा लॅपटॉप लाँच करण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.
शाओमीच्या लॅपटॉपशी टक्कर
रिअलमीचा लॅपटॉप लाँच होण्याची गोष्ट खरी असेल तर तो थेट शाओमीच्या मी नोटबूक 14 ला टक्कर देईल. याची किंमत 41999 इतकी आहे. रिअलमीदेखील याच रेंजमध्ये लॅपटॉप आणण्याच्या तयारीत दिसत आहे. रिअलमीचा हा पहिलाच लॅपटॉप असणार आहे.