झिऑक्स मोबाईल्सचा किफायतशीर फोर-जी स्मार्टफोन

By शेखर पाटील | Published: August 29, 2017 05:00 PM2017-08-29T17:00:00+5:302017-08-29T17:00:00+5:30

झिऑक्स मोबाईल्स या कंपनीने क्विक ऑरा फोर-जी (Quiq Aura 4G) हा स्मार्टफोन ५,१९९ रूपये मूल्यात भारतीय ग्राहकांना उपलब्ध केला आहे.

reasonable Four-G Smartphones by Xiaox Mobiles | झिऑक्स मोबाईल्सचा किफायतशीर फोर-जी स्मार्टफोन

झिऑक्स मोबाईल्सचा किफायतशीर फोर-जी स्मार्टफोन

ठळक मुद्देयातील मुख्य आणि फ्रंट हे दोन्ही कॅमेरे ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ७.० नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल.

झिऑक्स मोबाईल्स या कंपनीने क्विक ऑरा फोर-जी (Quiq Aura 4G) हा स्मार्टफोन ५,१९९ रूपये मूल्यात भारतीय ग्राहकांना उपलब्ध केला आहे.
झिऑक्स मोबाईल्स कंपनीने आपला हा स्मार्टफोन स्नॅपडील या शॉपींग पोर्टलवरून रोझ गोल्ड आणि शँपेन गोल्ड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येणार आहे. या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले असेल. १.३ गेगाहर्टझ् क्वाड-कोअर प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या मॉडेलची रॅम एक जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी इतके असेल. मायक्रो-एसडी कार्डचा सपोर्ट असल्यामुळे हे स्टोअरेज ६४ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यातील मुख्य आणि फ्रंट हे दोन्ही कॅमेरे ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. दोन्हीमध्ये फ्लॅश देण्यात आले आहेत.
झिऑक्स मोबाईल्स कंपनीच्या क्विक ऑरा फोर-जी या मॉडेलमध्ये ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आले असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ७.० नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल. शीर्षकात नमूद असल्यानुसार या स्मार्टफोनमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट देण्यात आला आहे. याच्या जोडीला जीपीएस, वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, मायक्रो-युएसबी, ओटीजी आदी सुविधाही देण्यात आल्या आहेत. तर यात प्रॉक्झीमिटी, ग्रॅव्हिटी आणि लाईट सेन्सर्सही असतील. यातील फिंगरप्रिंट स्कॅनर हे स्मार्टफोन लॉक/अनलॉक करण्यासोबत काही फंक्शन्सला सपोर्ट करणारे आहे. यात कॉलला उत्तर देणे, म्युझिक ट्रॅक बदलणे, प्रतिमा काढणे तसेच फेशियर रिकग्नेशन आदींचा समावेश आहे.

Web Title: reasonable Four-G Smartphones by Xiaox Mobiles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.