Jio-Airtel चे रिचार्ज महागणार, 5G Internet वापरणाऱ्यांनाही झटका बसणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 08:46 AM2024-01-15T08:46:24+5:302024-01-15T08:47:34+5:30
...2024 मध्ये काही महिन्यांनंतर जिओ आणि एअरटेल अनलिमिटेड 5G Data Plan संपुष्टात आणणार आहेत. एवढेच नाही, तर प्लॅन्सच्या किंमतीही 5-10% पर्यंत वाढविल्या जाऊ शकते.
Airtel आणि Jio यांच्यात प्लॅन्स आणि नेटवर्क आदी बाबतीत नेहमीच स्पर्धा दिसून येते. मात्र आता एका बातमीने 5G युजर्सना झटका बसू शकतो. कारण 2024 मध्ये काही महिन्यांनंतर जिओ आणि एअरटेल अनलिमिटेड 5G Data Plan संपुष्टात आणणार आहेत. एवढेच नाही, तर प्लॅन्सच्या किंमतीही 5-10% पर्यंत वाढविल्या जाऊ शकते.
माध्यमांतील वृत्तांनुसार या कंपन्या 4G टेरिफच्या मदतीनेही रेव्हेन्यू ग्रोथ वाढविण्यावर भर देत आहेत. ऑक्टोबर 2022 मध्ये जिओ आणि एअरटेलने 5G सर्व्हिस लॉन्च केली होती. तेव्हापासूनच युजर्सना 4G इंटरनेटच्या दरात 5G नेटवर्क दिले जात आहे. मात्र आता अनलिमिटेड 5G ऑफर लवकरच संपुष्टात येणार आहे. कारण या दोन्ही कंपन्या आता 5G सर्व्हिस प्लॅन्स संपविण्यासंदर्भात विचार करत आहेत.
या दोन्ही कंपन्या भारतात 5G वर सातत्याने काम करत आहेत. महत्वाचे म्हणजे, जिओ आणि एअरटेलची युजर संख्य 125 मिलियनहून अधिक आहे. 2024 मध्ये 5G युजर्सची संख्या 200 मिलियनवर पोहोचू शकते. ET ने दिलेल्या वृत्तानुसार, एअरटेल आणि जिओ आपल्या 5G प्लॅन्समध्ये 5-10 टक्क्यांपर्यंत वाढ करू शकते. एवढेच नाही, तर मार्केट शेअर वाढविण्यासाठी 30-40% अॅडिश डेटाचे ऑप्शनही दिले जाऊ शकते.
2 वर्षांपूर्वी वाढविण्यात आली होती किंमत -
संबंधित वृत्तानुसर, सप्टेंबर 2024 मध्ये मोबाइल टेरिफमध्ये 20 टक्क्यांची वाढ केली जाऊ शकते. गेल्या वेळी नोव्हेंबर 2021 मध्ये जिओ, एयरटेल आणि व्होडाने आपल्या टेरिफचे दर 19-25% वाढवीले होते.