लाँच होण्याआधी शाओमीचा स्वस्त स्मार्टफोन वेबसाईट लिस्ट; Redmi 10 येऊ शकतो लवकरच बाजारात 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 03:32 PM2021-08-13T15:32:47+5:302021-08-13T15:38:18+5:30

Redmi 10 On NBTC: Redmi 10 स्मार्टफोन NBTC वेबसाइटवर मॉडेल नंबर 21061119AG सह दिसला आहे. या लिस्टिंगमुळे लवकरच हा स्मार्टफोन थायलंडमध्ये लाँच होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

Redmi 10 appears on nbtc certification website launch soon  | लाँच होण्याआधी शाओमीचा स्वस्त स्मार्टफोन वेबसाईट लिस्ट; Redmi 10 येऊ शकतो लवकरच बाजारात 

लाँच होण्याआधी शाओमीचा स्वस्त स्मार्टफोन वेबसाईट लिस्ट; Redmi 10 येऊ शकतो लवकरच बाजारात 

googlenewsNext
ठळक मुद्देथायलंडनंतर हा स्मार्टफोन भारतासह जगभरातील बाजारपेठांमध्ये दिसू शकतो.  Redmi 10 स्मार्टफोनच्या मागे क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

शाओमी आपल्या Redmi लाईनअप अंतर्गत स्वस्त स्मार्टफोन लाँच करते. आता कंपनी आगामी Redmi 10 स्मार्टफोन काम करत आहे. हा स्मार्टफोन थायलंडच्या सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट करण्यात आला आहे. Redmi 10 स्मार्टफोन NBTC वेबसाइटवर मॉडेल नंबर 21061119AG सह दिसला आहे. या लिस्टिंगमुळे लवकरच हा स्मार्टफोन थायलंडमध्ये लाँच होऊ शकतो, अशी चर्चा आहे. थायलंडनंतर हा स्मार्टफोन भारतासह जगभरातील बाजारपेठांमध्ये दिसू शकतो.  

थायलंडच्या NBTC सर्टिफिकेशनमधील Redmi 10 च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली नाही. यातून फक्त या स्मार्टफोनचा मॉडेलनंबर आणि निकनेम समोर आले आहे. परंतु काही दिवसांपूर्वी रेडमीचा हा आगामी स्मार्टफोन एका ई-कॉमर्स साईट लिस्ट करण्यात आला होता. या लिस्टिंगमधून Redmi 10 च्या काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.  

Redmi 10 की स्पेसिफिकेशन 

Xiaomi Redmi 10 मध्ये 6.5-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा एलसीडी डिस्प्ले पॅनल असू शकतो. या आगामी रेडमी फोनमध्ये कंपनी MediaTek Dimensity G88 चिपसेट आणि Mali G52 GPU देऊ शकते. या फोनमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. या फोनमध्ये Android 11 आधारित MIUI 12 मिळू शकतो.   

Redmi 10 स्मार्टफोनच्या मागे क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य सेन्सर 50 मेगापिक्सलचा असेल, त्याचबरोबर एक 8 मेगापिक्सल आणि आणि दोन 2 मेगापिक्सलचे सेन्सर मिळू शकतात. Redmi 10 स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. हा रेडमी फोन 5000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर केला जाऊ शकतो.   

वरील स्पेसिफिकेशन्स फक्त लीक म्हणता येतील, जोपर्यंत शाओमी रेडमी 10 स्मार्टफोन बाजारात येत नाही तोपर्यंत अचूक माहितीसाठी वाट बघावी लागेल. हा फोन ऑगस्ट अखेरपर्यंत सादर केला जाऊ शकतो. परंतु शाओमीने या स्मार्टफोनबाबत अजूनतरी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.  

Web Title: Redmi 10 appears on nbtc certification website launch soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.