इतक्या स्वस्तात 6000mAh ची बॅटरी आणि 11GB RAM; रेडमी 10 पावर भारतात विक्रीसाठी उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 17:51 IST2022-04-30T17:50:55+5:302022-04-30T17:51:40+5:30
Redmi 10 Power स्मार्टफोन भारतात 50MP कॅमेरा, Snapdragon 680 चिपसेट, 11GB RAM आणि 6,000mAh च्या मोठ्या बॅटरीसह आला आहे.

इतक्या स्वस्तात 6000mAh ची बॅटरी आणि 11GB RAM; रेडमी 10 पावर भारतात विक्रीसाठी उपलब्ध
Xiaomi नं या महिन्याच्या सुरुवातीला एक शानदार स्मार्टफोन आपल्या रेडमी ब्रँड अंतर्गत सादर केला होता. Redmi 10 Power मध्ये 50MP कॅमेरा, Snapdragon 680 चिपसेट, 11GB RAM आणि 6,000mAh ची मोठी बॅटरी असे स्पेक्स मिळतील हे सांगण्यात आलं होतं. परंतु हा फोन खरेदीसाठी कधी उपलब्ध होईल हे मात्र सांगण्यात आलं नव्हता. आता Redmi 10 Power खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.
भारतातील किंमत आणि उपलब्धता
रेडमी 10 पावर आता कंपनीच्या अधिकृत वेबसाईट, अॅमेझॉन इंडिया आणि रिटेल स्टोर्सवरून विकत घेता येईल. या बजेट स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. याची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे. Redmi चा नवीन स्मार्टफोन स्पोर्टी ऑरेंज आणि पावर ब्लॅक रंगात विकत घेता येईल.
Redmi 10 Power चे स्पेसिफिकेशन्स
रेडमी 10 पावर स्मार्टफोनमध्ये 6.71 इंचाचा मोठा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एलसीडी पॅनल वॉटरड्रॉप नॉचसह येतो. फोन अँड्रॉइड 11 आधारित मीयुआय 13 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट दिला आहे. ग्राफिक्ससाठी एड्रेनो 610 जीपीयू मिळतो. यात 8GB RAM सोबत 3 जीबी एक्सपांडेबल रॅम मिळतो, त्यामुळे एकूण 11 जीबी रॅम होतो. सोबत 128GB स्टोरेज आहे.
रेडमी 10 पावरच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेन्स आहे. समोर 5 मेगापिक्सलच्या सेल्फी सेन्सर आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह फोनमध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा आहे. परंतु रेडमी 10 पावर स्मार्टफोनमधील 6,000एमएएचची मोठी बॅटरी याची खासियत म्हणता येईल.