आतापर्यंतचा सर्वात हलका Xiaomi स्मार्टफोन भारतात लाँच; 6000mAh ची बॅटरीसह Redmi 10 Prime बाजारात दाखल
By सिद्धेश जाधव | Published: September 3, 2021 02:41 PM2021-09-03T14:41:46+5:302021-09-03T14:47:33+5:30
Redmi 10 Prime Price: Redmi 10 Prime चे दोन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आला आहे. हा फोन Amazon, Mi.com आणि Mi Home स्टोर्सवरून 7 सप्टेंबर दुपारी 12 वाजल्यापासून विकत घेता येईल.
Xiaomi ने आज भारतात आपला बहुप्रतीक्षित बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. ठरल्याप्रमाणे आज कंपनीने Redmi 10 Prime देशात सादर केला आहे. लाँच पूर्वी सांगितल्याप्रमाणे या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G88 चिपसेट देण्यात आला आहे. हा गेमिंग चिपसेट मीडियाटेकने काही दिवसांपूर्वी बाजारात सादर केला होता. त्याचबरोबर रेडमी 10 प्राइम स्मार्टफोनमध्ये 6,000 एमएएच बॅटरी, 50MP कॅमेरा असे भन्नाट स्पेसिफिकेशन देण्यात आले आहेत. (Redmi 10 Prime launched in India with 6000mAh battery at Rs 12,499)
Redmi 10 Prime ची किंमत
Redmi 10 Prime चे दोन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आला आहे. या फोनचा 4GB RAM आणि 64GB स्टोरेज असलेला छोटा मॉडेल 12,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 14,499 रुपये मोजावे लागतील. Redmi 10 Prime व्हाइट, ब्लॅक आणि ब्लू कलरमध्ये उपलब्ध होईल. हा फोन Amazon, Mi.com आणि Mi Home स्टोर्सवरून 7 सप्टेंबर दुपारी 12 वाजल्यापासून विकत घेता येईल.
Redmi 10 Prime चे स्पेसिफिकेशन्स
Xiaomi Redmi 10 Prime स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. पंच होल कट-आऊटसह येणार हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 20:9 अस्पेक्ट रेशियोला सपोर्ट करतो. या डिस्प्लेला गोरिल्ला ग्लास 3 ची सुरक्षा देण्यात आली आहे. सिक्योरिटीसाठी यात उजव्या पॅनलवर पावर बटनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच यात ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 5, Bluetooth 5.0, GPS, IR blaster, Qj 3.5mm ऑडियो जॅक असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन देण्यात आले आहेत.
या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G88 SoC आहे. या रेडमी फोनमध्ये 6GB पर्यंतचा LPDDR4x RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन 2GB एक्सपांडेबल रॅमला सपोर्ट करतो. हा बजेट स्मार्टफोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टम आधारित MIUI 12.5 वर चालतो. Redmi 10 Prime चा आकार 161.95 X 75.57 X 9.56 मिमी आणि वजन 192 ग्राम आहे.
Xiaomi Redmi 10 Prime 10 मध्ये कंपनीने क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, त्याचबरोबर 8-मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड लेन्स, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. या रेडमी फोनमधील 6,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंग आणि 9W रिवर्स वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करते.