टाईट बजेट असणाऱ्या लोकांसाठी गुड न्यूज! दहा हजारांच्या आत Redmi चा दमदार Smartphone  

By सिद्धेश जाधव | Published: April 15, 2022 12:46 PM2022-04-15T12:46:56+5:302022-04-15T12:47:11+5:30

Redmi 10A India Launch Date: शाओमी आपल्या सब ब्रँड रेडमी अंतर्गत 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत नवीन स्मार्टफोन भारतात सादर करणार आहे.  

Redmi 10A Launch India Date Confirmed Specifications Price Leaked  | टाईट बजेट असणाऱ्या लोकांसाठी गुड न्यूज! दहा हजारांच्या आत Redmi चा दमदार Smartphone  

टाईट बजेट असणाऱ्या लोकांसाठी गुड न्यूज! दहा हजारांच्या आत Redmi चा दमदार Smartphone  

Next

Xiaomi आपले बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्स रेडमी ब्रँड अंतर्गत सादर करते. आता असाच एक स्वस्त स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला येणार आहे. कंपनीनं Redmi 10A च्या भारतातील लाँचची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे हा फोन याआधी चीनमध्ये आला आहे. येत्या 20 एप्रिलला हा डिवाइस भारतीयांच्या भेटीला येईल. Amazon च्या वेबसाईटवर हा मोबाईल ‘देशाचा स्मार्टफोन’ म्हणून टीज करण्यात आला आहे.  

Redmi 10A ची संभाव्य किंमत 

Redmi 10A सध्या फक्त टीज करण्यात आला आहे. त्यामुळे या फोनच्या किंमतीची माहिती मिळाली नाही. परंतु चीनमधील फोनची किंमत पाहता अंदाज लावता येईल. तिथे हा फोन 7,700 भारतीय रुपयांच्या आसपास लाँच झाला आहे. त्यामुळे भारतातील किंमत देखील 10 हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते.  

Redmi 10A चे स्पेसिफिकेशन्स  

Redmi 10A स्मार्टफोन 6.53-इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. कंपनीनं या स्मार्टफोनला ऑक्टा-कोर मीडियाटेक Helio G25 प्रोसेसरसह PowerVR8320 GPU ची प्रोसेसिंग पावर दिली आहे. रेडमीचा हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12.5 वर चालतो. सोबत 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यांतची स्टोरेज देण्यात आली आहे.  

Redmi 10A स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसहा 13MP कॅमेरा देण्यात आला आहे. तर फ्रंटला 5MP चा सेल्फी शुटर आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स तर मिळतात सोबत कमी किंमतीत देखील रियर फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा देण्यात आली आहे. Redmi 10A स्मार्टफोन 5000mAh च्या बॅटरीसह सादर झाला आहे, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.   

Web Title: Redmi 10A Launch India Date Confirmed Specifications Price Leaked 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.